Anant Chaturdashi 2023 : अनंत चतुर्दशीला मीन राशीत चंद्र देव करणार गोचर, 3 राशींना होणार लाभ

Anant Chaturdashi 2023 : कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत असेल तर त्या व्यक्तीला सर्व सुख प्राप्त होता. 

नेहा चौधरी | Updated: Sep 27, 2023, 10:00 AM IST
Anant Chaturdashi 2023 : अनंत चतुर्दशीला मीन राशीत चंद्र देव करणार गोचर, 3 राशींना होणार लाभ  title=
anant chaturdashi 2023 moon will transit in pisces these 3 zodiac signs will have get luck

Chandra Gochar 2023 : गणेशोत्सवाचा धूम शेवटच्या टप्प्यात आली आहे. गणेश चतुर्थीपासून गणराया भक्तांचा पाहुणचार घेण्यासाठी आला आहे. अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा आल्या गावाला जाणार. गणेश विसर्जनाचा हा दिवस यंदा ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय खास असणार आहे. चंद्र हा अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपली रास बदलणार आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्र देवाला सोम असंही म्हणतात. असं म्हणतात की, कुंडलीतील चंद्र देव बलवान असेल तर त्या जाचकाला आयुष्यात सर्व सुख मिळतं. तर हाच चंद्र कुंडलीत कमजोर असले तर त्या जाचकाच्या आयुष्यात मानसिक तणाव राहतो. 

ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा सर्वात गतीने आपली रास बदलतो. चंद्र देव एका राशीत अडीच दिवस असतो. त्यानंतर तो दुसऱ्या राशीत प्रवेश करतो.  अनंत चतुर्दशी म्हणजे गणेश विसर्जनाला चंद्रदेव कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. चंद्राच्या या संक्रमाणामुळे तीन राशींच्या लोकांना सर्वाधिक लाभ होणार आहे. 

अनंत चतुर्दशी तिथी (Anant Chaturdashi Tithi)

हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी असते . यंदा अनंत चतुर्दशी गुरुवारी 28 सप्टेंबरला आहे. या दिवशी गणेश विसर्जनही केलं जाणार आहे. त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. 

चंद्र गोचर वेळ (Chandra Gochar 2023)

ज्योतिषानुसार, चंद्र 28 सप्टेंबरला रात्री 08:27 वाजता कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. चंद्रदेव पुढील अडीच दिवस मीन राशीत असणार आहे. यानंतर ते मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत संक्रमण करणार आहे. 

मीन (Pisces Zodiac)

मीन राशीच्या लोकांसाठी चंद्राच्या संक्रमणामुळे आयुष्यात सकारात्मक गोष्टी होणार आहे. या लोकांना चंद्र देवाच्या कृपेने मानसिक तणावातूनही मुक्ती मिळणार आहे. आईचे आरोग्य सुधारणार आहे. अविवाहित लोकांच्या आयुष्यात लग्नाचा प्रस्ताव येणार आहे. प्रियकर आपल्या जोडीदारासमोर आपल्या भावना व्यक्त करणार आहेत. घरात आनंद आणि प्रसन्न वातावरण असेल. 

वृषभ (Taurus Zodiac) 

चंद्र संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना चंद्र देवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे. या लोकांच्या घरात लक्ष्मीचा वास असणार आहे. अनेक क्षेत्रातून तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. परदेशवारीचा योग आहे. मानसिक समस्या दूर होणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Chandra Grahan 2023 : वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 3 राशीच्या लोकांचं भाग्य चंद्रासारखं चमकणार! राहू-केतू, शनि करणार मालामाल

कर्क (Cancer Zodiac) 

कर्क राशीचा स्वामी चंद्रदेव असल्याने या राशीच्या लोकांना सर्वाधिक फायदा होणार आहे.. कर्क राशीच्या भाग्य घराकडे चंद्र देव विराजमान असणार आहे. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांचे भाग्य चंद्रासारखे चमकणार आहे. आजूबाजूचं वातावरण सकारात्मक असणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. या काळात शुभ कार्य ठरणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या