Shani - Shukra : 30 वर्षांनंतर शुक्र - शनिदेवाचा युती! 'या' राशींचा सुवर्णकाळ, करिअरमध्ये प्रगतीसोबत मिळणार भरपूर पैसा

Conjunction Of Saturn And Venus 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीमध्ये शुक्र आणि शनि यांचा संयोग होणार आहे. या संयोगामुळे 3 राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरु होणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jan 7, 2024, 09:50 PM IST
Shani - Shukra : 30 वर्षांनंतर शुक्र - शनिदेवाचा युती! 'या' राशींचा सुवर्णकाळ, करिअरमध्ये प्रगतीसोबत मिळणार भरपूर पैसा title=
After 30 years Shani Shukra or Venus Saturn Conjunction Golden period of these zodiac signs lots of money with career advancement

Conjunction Of Saturn And Venus 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी आपली स्थिती बदलतो. या स्थिती बदलामुळे कुठल्या ना कुठल्या राशीमध्ये मित्र आणि शत्रू ग्रहांचं मिलन होतं. अशातून शुभ आणि अशुभ योग निर्माण होतो. या योगाचा मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर परिणाम होतो. हे वर्ष शनिदेवाचं वर्ष असून सध्या शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहे. अशात मार्च महिन्यात कुंभ राशीत शुक्राची एन्ट्री होार आहे. त्यामुळे तब्बल 30 वर्षांनंतर कुंभ राशीत शुक्र आणि शनी यांचा संयोग होणार आहे. यातून 3 राशीच्या लोकांचं नशीब चमकणार आहे. आर्थिक प्रगतीसोबत करिअरमध्ये यश लाभणार आहे. (After 30 years Shani Shukra or Venus Saturn Conjunction Golden period of these zodiac signs lots of money with career advancement)

मिथुन रास (Gemini Zodiac)

शनि आणि शुक्राचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. हा संयोग तुमच्या राशीच्या नवव्या भावात निर्माण होणार आहे. त्यामुळे या संयोगामुळे नशीब तुम्हाला साथ देणार आहे. तसंच तुमच्या नियोजित योजना यशस्वी होणार आहेत. त्याच वेळी, करिअरच्या बाबतीत तुम्हाला कुठूनतरी चांगली बातमी मिळणार आहे. तुमच्या राशीच्या लोकांना यावेळी अचानक पैसे मिळणार आहेत. तसंच, यावेळी तुम्ही देश-विदेशातही प्रवास करणार आहात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. 

कुंभ रास (Aquarius Zodiac) 

शनि आणि शुक्राची जोडी तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. कारण हा संयोग तुमच्या संक्रमण कुंडलीच्या चढत्या घरात निर्माण होणार आहे. त्यामुळे यावेळी तुमचं व्यक्तिमत्व चमकणार आहे. तुमचा आर्थिक सन्मानही द्विगुणीत वाढ होणार आहे. शनि आणि शुक्र यांच्या संयोगाच्या प्रभावामुळे तुमच्या ज्ञानात वाढ होणार आहे. तुमचा आत्मविश्वास पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होणार आहे. त्याचबरोबर शनिदेवाने तुमच्या राशीत शश महापुरुष राजयोग निर्माण केल्यामुळे मालमत्ता आणि वाहनाचे सुख तुम्हाला लाभणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Surya Gochar 2024 : तब्बल 1 वर्षांनंतर सूर्यदेव कुंभ राशीत, 'या' राशीच्या लोकांना अमाप संपत्ती

तूळ रास (Libra Zodiac)  

शनी आणि शुक्राचा संयोग तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. कारण हा संयोग तुमच्या राशीच्या पाचव्या भावात निर्माण होणार आहे. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. तूळ राशीच्या लोकांना शैक्षणिक स्पर्धेच्या क्षेत्रात फायदा होणार आहे. तुम्हाला पैशाच्या गुंतवणुकीत चांगला परतावा मिळणार आहे. शेअरची कामं करणाऱ्यांसाठी हा काळ लाभदायक असणार आहे. अनपेक्षित आर्थिक लाभही होणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)