Kendra Tirkon Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, एका निश्चित काळानंतर प्रत्येक ग्रह राशी परिवर्तन करतात. न्यायाचा देव शनी ठराविक काळानंतर राशी बदलतो. तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. याचाच अर्थ त्याला एकाच राशीत पुन्हा येण्यासाठी सुमारे 30 वर्षे लागतात. शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत आहे. यावेळी शनी देव शाश राजयोगाव्यतिरिक्त केंद्र त्रिकोण राजयोग तयार करत आहेत. म्हणजेच तब्बल 30 वर्षांनंतर केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला.
वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, कुंडलीमध्ये केंद्र त्रिकोण योग तयार होणं अत्यंत शुभ मानण्यात येतं. हे जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये फायदे देतं. केंद्र त्रिकोण राजयोगामुळे अनेक राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे.
कुंभ राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राजयोग खूप फायदेशीर ठरू शकणार आहेत. या राशीच्या लोकांसाठी अचानक आर्थिक लाभासोबत उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार आहेत. आत्मविश्वास आणि धैर्य वाढू शकतं. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. समाजात मान-सन्मान वाढेल. नोकरदार लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे.
या राशीसाठीही केंद्र त्रिकोण राजयोग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. बिघडलेली सर्व कामे मार्गी लागतील. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. यासोबतच नोकरी आणि व्यवसायातही प्रगती होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे.
हा राजयोग या राशीच्या लोकांना विशेष लाभ देऊ शकतो. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील. लग्न झाले असेल तर सासरच्या लोकांकडून तुम्हाला खूप आदर मिळेल. वडिलधाऱ्यांच्या मदतीने तुम्ही अनेक क्षेत्रात यश मिळवू शकता.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )