Kuber Yog: 12 वर्षांनंतर गुरु ग्रहाने तयार केला कुबेर योग; 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु होण्याची शक्यता

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे शुभ आणि राजयोग तयार करतात. 

सुरभि जगदीश | Updated: Jul 10, 2024, 09:38 PM IST
Kuber Yog: 12 वर्षांनंतर गुरु ग्रहाने तयार केला कुबेर योग; 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु होण्याची शक्यता title=

Guru Gochar 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे शुभ आणि राजयोग तयार करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होताना दिसतो. असंच येत्या काळात एक खास राजयोग तयार होणार आहे.

गुरू ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे आणि मे 2025 पर्यंत तो याच राशीत राहणार आहे. वृषभ राशीतील गोचरामुळे कुबेर राजयोग तयार झाला आहे. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. यावेळी काही लोकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशी लकी आहेत.

मेष रास

कुबेर राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात विवाहित जोडप्यांना लाभ मिळतील आणि त्यांचे वैवाहिक जीवन सुखी आणि शांत होईल. यावेळी नशीबही तुमची साथ देईल. पैसे जोडण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीमुळे आणि प्रामाणिकपणामुळे चांगले परिणाम मिळतील. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळेल. 

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी कुबेर राजयोगाची निर्मिती शुभ ठरू शकते. कारण तुमच्या कुंडलीतील उत्पन्न आणि लाभ स्थानात गुरु ग्रहाचे भ्रमण आहे. तुम्ही परदेशातही पैसे गुंतवू शकता. यावेळी तुम्हाला गुंतवणुकीचे फायदे मिळतील. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. यावेळी व्यावसायिक लोक मोठा व्यवसाय करू शकतात. यावेळी तुम्हाला शेअर बाजारात फायदा होऊ शकतो.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी कुबेर योग तयार होऊ शकतो. यावेळी तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. या काळात तुम्ही देश-विदेशात सहलीला जाऊ शकता. जर व्यावसायिक दीर्घ काळापासून आपला व्यवसाय पुढे नेण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असतील तर यावेळी तुम्हाला यश मिळू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)