Bhaum Aditya Yog: वृश्चिक राशीत मंगळ-सूर्याच्या युतीने बनला अद्भुत योग; 'या' राशींना येणार सोन्यासारखे दिवस

Bhaum Aditya Yog: सूर्य आणि मंगळाच्या संयोगामुळे भौम आदित्य नावाचा दुर्मिळ योग तयार झाला आहे. याशिवाय सूर्य-मंगळ देखील राहू आणि शनीच्या प्रभावाखाली राहणार आहे.

सुरभि जगदीश | Updated: Nov 24, 2023, 08:50 AM IST
Bhaum Aditya Yog: वृश्चिक राशीत मंगळ-सूर्याच्या युतीने बनला अद्भुत योग; 'या' राशींना येणार सोन्यासारखे दिवस title=

Bhaum Aditya Yog: ज्योतिषीय शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार राशीमध्ये बदल करतो. यावेळी राशी बदलामुळे एकाच वेळी दोन ग्रहांची युती होते. असंच वृश्चिक राशीमध्ये सूर्य-मंगळाच्या संयोगामुळे भौम आदित्य योग तयार झाला आहे. सूर्यदेवाने 17 नोव्हेंबरला वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. अशातच मंगळ आधीच या ठिकाणी उपस्थित आहे. 

अशा स्थितीत सूर्य आणि मंगळाच्या संयोगामुळे भौम आदित्य नावाचा दुर्मिळ योग तयार झाला आहे. याशिवाय सूर्य-मंगळ देखील राहू आणि शनीच्या प्रभावाखाली राहणार आहे. अशा स्थितीत मंगळ आणि सूर्यामुळे तयार झालेला हा योग काही राशींसाठी शुभ मानला जातो. जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी मंगळ आणि सूर्याचा भौम आदित्य योग कोणत्या राशींसाठी शुभ ठरणार आहे.

मेष रास

ज्योतिषीय गणनेनुसार सूर्य-मंगळाचा भौम आदित्य योग सर्व प्रकारे शुभ मानला जातो. भौम आदित्य योगाच्या शुभ प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांच्या जीवनात विशेष बदल दिसून येणार आहेत. या काळात नोकरीत बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. वैवाहिक जीवनात आनंद राहणार आहे. प्रेम जीवनात जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळू शकतं. 

वृषभ रास

भौम आदित्य योगाच्या शुभ प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायात खूप प्रगती होणार आहे. याशिवाय नोकरी करणाऱ्यांचीही या काळात खूप प्रगती होणार आहे. या काळात केलेल्या मेहनतीचा तुम्हाला पुरेपूर फायदा मिळेल. तुमच्या प्रेमसंबंध सुधारणा होणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीचे जे लोक स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत त्यांना सूर्य आणि मंगळाचा विशेष आशीर्वाद मिळू शकणार आहे. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकतं. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. व्यवसायात आर्थिक लाभाच्या अनेक शक्यता आहेत. 

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांना सूर्य-मंगळाच्या भौम आदित्य योगाचे शुभ परिणाम मिळणार आहे. या काळात सूर्याच्या कृपेने नोकरीत बढती मिळू शकते. मंगल देवाच्या कृपेने वैवाहिक जीवन आणि लव्ह लाईफमध्ये सकारात्मक बदल दिसून येणार आहेत. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )