१० कारणे का भाजप घेणार सोबत सेनेला

Nov 28, 2014, 11:45 AM IST
1/10

10. इतर नाराज घटकपक्ष
शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन न घेतल्याने भाजपचे घटकपक्ष काहीसे नाराज होते. आज जी परिस्थिती सेनेवर आली आहे ती उद्या आपल्यावर येईल, याची भीती त्यांना वाटू लागली होती. त्यामुळे त्यांनी या दिशेने प्रयत्न सुरु केला होता. आपला पक्षाचा बेस वाढवायचा आणि त्या त्या राज्यात भाजपला कमकुवत करण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे याची वेळीच नोंद घेत महायुती पुन्हा साकारण्यात आली आहे.

2/10

9. शिवसेनेचा.. वेट अॅण्ड वॉच
शिवसेनेच्या खरेच कौतुक वाटते. शिवसेना घाईत सरकारमध्ये सहभागी झाली असती तर काहीच पदे पदरात पडली असती. शिवाय कायम बचावाचे राजकारण करावे लागले असते. पण सेनेने वेट अॅण्ड वॉचचे धोरण अवलंबले. यामुळे प्रसंगी सेनेत फुट किंवा मोठी बंडखोरी होण्याची दाट शक्यता होती. तरीही या संकटांवर मात करीत सेनेने गड शाबूत राखला. आणि अखेर विजय मिळवला.

3/10

8. वास्तवापासून दूर राहिलेलं भाजप
विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळेल, सत्ता समिकरणे सहज जुळवता येतील, असा काहीसा गैरसमज भाजपच्या मनात होता. पण वास्तवात परिस्थिती वेगळी ठरली. सत्य परिस्थिती जाणून घेण्यात भाजपचे नेते अपुरे पडले. 

4/10

7. फसलेली गणिते..
भाजप अध्यक्ष अमित शहा आक्रामक राजकारणासाठी ओळखले जाते. विधानसभा निवडणुकीत भाजपचा दिलेल्या आक्रामकपण शहा यांच्यापासून सुरू झाला होता. पण नेहमीच हे करणे शक्य नाही. शिवाय शिवसेनेला कोंडित पकडण्याचे भाजपचे धोरण पुरते फसले आहे. उलट यामुळे भाजपच आणखी तणावाखाली येत गेला.

5/10

6. मुख्यमंत्र्यांचा अनुभव नडला..
सध्याच्या घडीला शरद पवारांसारखा अनुभवी नेता भाजपकडे असता तर सहज सत्तेची समिकरणे जुळत गेली असती. फडणवीस यांच्या अनुभव बघता त्यांना अशी जुळवाजुळव करता आली नाही. यामुळेही भाजपने खालती पायरी घेतली आहे. 

6/10

5. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हेकेखोरपणा..
भाजपने आमचा पाठिंबा कायमस्वरुपी गृहित धरु नये, तो काही मुद्द्यांवर आणि राज्याच्या भल्यासाठी देण्यात आला आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेक वेळा केले. यामागे राजकीय गणिते असली तरी राष्ट्रवादी काही विश्वासार्ह नसल्याचे भाजपच्या कळाले. केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असताना जयललिता यांनी भाजपच्या तोंडाला आणलेला फेस. अजूनही हा पक्ष विसरु शकला नाही.

7/10

4. महत्वाचे हिवाळी अधिवेशन
हिवाळी अधिवेशन आता काही दिवसांवर आले आहे. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे तिनही पक्ष जवळपास विरोधात असल्याने भाजपची गय न्हवती. शिवाय यांना तोंड देऊ शकेल असा एकही अनुभवी नेता भाजपकडे नाही. त्यामुळे वेळीच शहाणपण आले आणि भाजपने हुशारीचा निर्णय घेतला आहे.

8/10

3. ढासळलेली सत्ता..
बहुमत सिध्द करण्यावेळी आवाजी मतदान घेऊन भाजपने आपली किंमत घालवली. महाराष्ट्राची ओळख असलेल्या शिवसेनेला झुलवत ठेवणाऱ्या भाजपची प्रतिमा काहीशी ठिक न्हवती.
भाजपमधील राष्ट्रीय नेतृत्वाचा एकाधिकार काही प्रामाणात संपुष्ठात आला. अन्यथा याचा पुढील निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला असता. 

9/10

2. शिवसेनेची सततचे रोखठोक..
दुष्काळाच्या मुद्यावरून शिवसेनेने भाजपला प्रचंड विरोध केला. एकनाथ खडसेंच्या वकत्व्याने त्यांची तुलना थेट अजित पवारांशी केली गेली. शिवसेनेचा सततचा हा विरोध भाजपाला प्रत्येक वेळेस त्रासदायक ठरत होता अशात शिवसेनेला सत्तेत समावून घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता. आता 'मेरीभी चुप और तेरीभी चुप'.

10/10

1. सरकारच्या मनातील हुरहूर..
आवाजी मतदान घेऊन बहुमत सिद्ध करण्यात आलेल्या सरकारविषयी सगळ्यांनीच कठोर टीका व्यक्त केल्या. अशा परिस्थितीत कोणाचाच थेट पाठींबा नाही. काही दिवसांच्या सरकारला पुन्हा निवडणुका घेण्याची वेळ येणार असे वातावरण सर्वत्र होते