राजघराण्याची लेक ते स्टार क्रिकेटरची पत्नी; बदललेल्या रुपातील या सौंदर्यवतीला ओळखलं?

नवं प्रोजेक्ट असो किंवा अगदी खासगी जीवनातील एखादी आनंदाची, आव्हानाची किंवा महत्त्वाची गोष्ट असो. याच सोशल मीडियावर सध्या एका अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत. 

Jan 21, 2025, 12:15 PM IST

सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच सेलिब्रिटी त्यांच्या जीवातील अनेक गोष्टी त्यांच्या चाहत्यांपर्यंत आणत असतात.

1/7

फोटो

Zaheer Khan wife Sagarika Z Ghatge shares photos from new shoot location see photos

हा फोटो पाहून तुमच्या काही लक्षात येतंय का? हा चेहरा ओळखीचा वाटतोय का? फोटोमध्ये दिसणारी ही अभिनेत्री कोणी साधीसुधी महिला नसून, ती राजघराण्याची सदस्य आणि भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडूची पत्नीसुद्धा आहे.   

2/7

सागरिका घाटगे

Zaheer Khan wife Sagarika Z Ghatge shares photos from new shoot location see photos

ही अभिनेत्री आहे सागरिका घाटगे. कागलशी थेट संबंध असणाऱ्या विजयंस घाटगे यांची ही लेक. तर, झहीर खान या क्रिकेटपटूची ही पत्नी. याव्यतिरिक्तही सागरिकाची आणखी एक ओळख म्हणजे एक अभिनेत्री, एक उद्योजिका. 

3/7

इन्स्टाग्राम फोटो

Zaheer Khan wife Sagarika Z Ghatge shares photos from new shoot location see photos

सागरिकानं नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. कायमच पतीसोबतची एखादी सहल किंवा एखाद्या तत्सम क्षणाचा फोटो शेअर करणाऱ्या सागरिकानं यावेळी तिच्या कामाविषयीची माहिती चाहत्यांना दिली आहे. 

4/7

चित्रपट

Zaheer Khan wife Sagarika Z Ghatge shares photos from new shoot location see photos

'ललाट' नावाच्या आगामी चित्रपटातून सागरिका झळकणार असून, याच चित्रपटाच्या शूटिंग लोकेशनवरील फोटो तिनं शेअर केले आहेत. रुपेरी पडद्यापासून बराच काळ दूर राहिल्यानंतर पुनरागमनाचा हा काळ आव्हानात्मक असल्याचं तिनं इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं.   

5/7

कृतज्ञता

Zaheer Khan wife Sagarika Z Ghatge shares photos from new shoot location see photos

आपल्याला जे आवडतं ते करण्यासाठी या जगतात परतणं हे कधीच सोपं नव्हतं असं म्हणताना तिनं मिळालेल्या संधीसाठी कृतज्ञता व्यक्त केली. 

6/7

भूमिका

Zaheer Khan wife Sagarika Z Ghatge shares photos from new shoot location see photos

आपली भूमिका नेमकी किती वेगळी आहे आणि हे पात्र साकारण्यासाठी नेमकी कशी मेहनत घेतली जात आहे याचीही माहिती तिनं चाहत्यांना दिली. 

7/7

नवी संधी

Zaheer Khan wife Sagarika Z Ghatge shares photos from new shoot location see photos

कलाविश्वात एका नव्या संधीसह प्रेक्षकांची मनं जिंकू पाहणाऱ्या सागरिकाचा हा लूक तुम्हाला कसा वाटला? (सर्व छायाचित्र- सागरिका घाटगे/ इन्स्टाग्राम)