सैफवर हल्ला झाला तेव्हा बिल्डींगचे सिक्युरीटी गार्ड काय करत होते? मोठा खुलासा; पोलीस म्हणाले, 'आरोपीने स्वतःचे..'

Saif Ali Khan Attack What Was Security Guards Doing: सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा त्याच्या इमारतीमधील सुरक्षारक्षक काय करत होते? असा प्रश्न अनेकांना पडला असून त्याचं उत्तर सापडलं आहे.

Swapnil Ghangale | Jan 21, 2025, 12:39 PM IST
1/11

saifalikhansecuritywatchman

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या तपासामध्ये अनेक थक्क करणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत.

2/11

saifalikhansecuritywatchman

अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर चाकू हल्ल्यासंदर्भातील काही रंजक माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे.  

3/11

saifalikhansecuritywatchman

सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर सोशल मीडियापासून ते अगदी सर्वसामान्य चर्चेमध्येही तो राहत असलेल्या 'सदगुरू शरण' इमारतीचे वॉचमन तेव्हा काय करत होते असा प्रश्न अनेकदा चर्चेत आला. त्याचं उत्तरही पोलीस तपासात सापडलं आहे.  

4/11

saifalikhansecuritywatchman

सैफ अली खान राहत असलेल्या 'सदगुरू शरण' इमारतीच्या कॉरिडॉर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. तसेच इमारतीत प्रवेश करताना कोणीही आरोपीला हटलं नाही. पण इतर सीसीटीव्हींमध्ये आरोपी कैद झाला.  

5/11

saifalikhansecuritywatchman

तसेच या इमारतीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दोन सुरक्षारक्षकांपैकी एक जण केबिनमध्ये तर दुसरा गेटवर झोपला होता, असे तपासात उघड झाले आहे.  

6/11

saifalikhansecuritywatchman

वॉचमन जागेवर नसल्यामुळेच आरोपी शरीफुल इस्लाम सज्जद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर हा 10 व्या मजल्यापर्यंत शिड्यांनी तर अकरावा मजला एसी डकमधील पाईपने चढून गेला, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.  

7/11

saifalikhansecuritywatchman

आवाज होऊ नये म्हणून आरोपीने स्वतःचे बूट बॅगमध्ये ठेवले होते. त्याने पळताना कपडे बदलले आणि स्वतःचा फोन बंद ठेवला होता.  

8/11

saifalikhansecuritywatchman

आपली ओळख लपवण्यासाठी आरोपीने घेतलेली सर्व खबरदारी पाहता आरोपी बांगलादेशमध्येही सराईत गुन्हेगार असावा, असा संशय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.  

9/11

saifalikhansecuritywatchman

शरीफुलला पुन्हा 'सदगुरू शरण' इमारतीमध्ये नेऊन सैफवर केलेल्या हल्ल्याचे पोलिस रिक्रिएशन 21 जानेवारीच्या पहाटे करण्यात आलं. त्यामधूनही बरीच माहिती उघड होईल, असे तपास अधिकारी म्हणाले आहेत.  

10/11

saifalikhansecuritywatchman

आरोपी शरीफुल इमरतीमधून तोंडावरचा कपडा काढून पळाला होता. पोलिसांनी फेस रेकग्नायजेशन अॅपच्या मदतीने अंधेरी ते वांद्रे परिसरात त्याचा शोध घेतला. तो 1 आणि 9 जानेवारी रोजी अंधेरीमध्ये दिसला.  

11/11

saifalikhansecuritywatchman

9 जानेवारीचे फुटेज तपासल्यावर अंधेरीत ज्या लेबर कंत्राटदारासोबत गेला त्याच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून पोलिस कंत्राटदारापर्यंत पोहोचले. त्यांनी आरोपीची ओळख पटवली आणि अखेर त्याला जेरबंद करण्यात यश आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.