मुंबई : अनेकदा रस्त्याने जाताना अथवा सार्वजनिक ठिकाणी काही असे कपल्स असतात जे खुलेआम रोमान्स करत, किस करत असतात. अशा प्रकारची दृश्ये पाहून इतर लोकांना लाज वाटते तर काहींच्या मते ही एक प्रेम व्यक्त करण्याची पद्धत असते.
सार्वजनिक ठिकाणी रोमान्स हा प्रेम व्यक्त करण्यासाठी नव्हे तर केवळ शो ऑफ करण्याचसाठी केला जातो असे एका संशोधनातून समोर आलेय. इतकंच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी प्रेमाचे प्रदर्शन करण्यामागचे मोठे कारण म्हणजे इमेज बनवणे.
संशोधनानुसार, सार्वजनिक ठिकाणी प्रेमाचे प्रदर्शन करणाऱ्या या कपल्समध्ये साधारण ३७ टक्के मुले आणि ३२ टक्के मुली या शाळेत जाणाऱ्या असतात. स्कूल इमेजला बदलण्यासाठी ही मुले अशा प्रकारे प्रेमाचे प्रदर्शन करतात.
संशोधनात हेही समोर आलेय की ३८ टक्के पुरुष हे स्वत:ची इमेज हिरो म्हणून बनवण्यासाठी खुलेआम प्रेमाचे प्रदर्शन करतात.