पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; पुरेसा पाऊस न झाल्याने महापालिकेचा मोठा निर्णय

 शहरात सोमवारपासून पाणीकपात लागू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी परिसरात अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.  

Updated: Jul 1, 2022, 08:26 AM IST
पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; पुरेसा पाऊस न झाल्याने महापालिकेचा मोठा निर्णय title=

सागर आव्हाड, पुणे : शहरात सोमवारपासून पाणीकपात लागू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी परिसरात अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.  

शहरात सोमवारपासून पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचे वेळापत्रक आज महापालिकेकडून जाहीर होईल. काही भागात दिवसाआड, तर काही भागात कमी प्रमाणात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला. अद्याप पाऊस सुरू झाला नसल्याने पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. 

आज पासून पाणीपुरवठा कपातीसंबंधीचे नियोजन जाहीर केले जाईल व सोमवारपासून ही कपात लागू होईल.