सागर आव्हाड, पुणे : राज्यात कोरोनाची तिसरी लाट धोकादायक स्थर गाठत असताना, पुणेकरांसाठीही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोना संसर्गाचा सर्वाधिक पॉझिटिव्हीटी रेट पुण्यात जास्त असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत दिवसाला 40 हजाराहून अधिक जणांची भर पडत आहे. पुण्यातही कोरोना संसर्गाचा वेग गंभीर होत आहे. काल (9 जानेवारी 2022) पुण्यातील नवीन रुग्णसंख्येन चार हजारांचा टप्पा पार केला होता.
पुणे शहराचा कोरोना पॉझिटिव्ह रेट सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारच्या आकडेवारीनुसार पॉझिटीव्ह रेट तब्बल 22 टक्क्यांवर असल्याचे अहवालाद्वारे स्पष्ट झाले आहे. रविवारी केलेल्या 18 हजार चाचण्यामधून 4029 जण कोरोनाबधित असल्याची नोंद झाली आहे.
पुणे शहरात तब्बल आठ महिन्यांनी 4 हजारांचा आकडा गाठला आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सर्वोच्च रुग्णसंख्येची नोंद होऊ शकते असा तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे.
जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात पुण्यातील पॉझिटिव्ह रेट 28 ते 30 टक्क्यांवर असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर साथ ओसरेल अस काही तज्ञाकडून वर्तवले जातेय. त्यामुळे पुणेकरांनी अधिक काळजी घेण्याच प्रशासनाने केलं आवाहन