पुण्यात इमारतीत शिरलेल्या बिबट्याचा पाच जणांवर हल्ला

अखेर त्याला जेरबंद करण्यात यश

Updated: Feb 4, 2019, 03:47 PM IST
पुण्यात इमारतीत शिरलेल्या बिबट्याचा पाच जणांवर हल्ला  title=

पुणे : पुण्यातील मुंढवा केशवनगर भागात शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या शिरला होता. इथे बांधकाम सुरू असणाऱ्या एका इमारतीमध्ये हा बिबट्या शिरल्याची माहिती तात्काळ अग्निशमन दल आणि वनविभागाला देण्यात आली. ज्यानंतर वनविभाग आणि अग्निशमन दलाचं बचाव पथक यांच्या संयुक्त प्रयत्नांनंतर बिबट्याला पकडण्याची मोहिम सुरु झाली आणि अखेर त्यात यश मिळालं. बिबट्याच्या या हल्ल्यात एक आजीबाई जखमी झाल्या असल्याचं कळत आहे.

जाळी टाकून बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. जवळपास दीड- दोन तासांपासून बिबट्याला पकण्याचं काम सुरू असून या अभियानादरम्यान एक जण जखमी झालाय. मुंढवा भागात असणारी ही इमारत नवीनच असून, त्याच्या ए विंगमध्ये नागरिक वास्तव्यास आले आहेत. तर, बी विंगमध्ये ज्या ठिकाणी काम सुरू होतं तिथे हा बिबट्या होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. बिबट्याला पकण्याचे प्रयत्न सुरू असताना बरीच काळजी घेण्यात आली. यामध्ये बघ्यांच्या गर्दीमुळे अग्निशमन दलाला अडचणीही आल्या होत्या.