10 वी - 12 वी च्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका जळून खाक; काय घडलं नक्की वाचा

नाशिक महामार्गावरील संगमनेर चंदनपुरी घाटात बुधवारी पहाटे 10 वी 12 वी च्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग लागली. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. 

Updated: Feb 23, 2022, 02:11 PM IST
10 वी - 12 वी च्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका जळून खाक; काय घडलं नक्की वाचा title=

सागर आव्हाड, पुणे : नाशिक महामार्गावरील संगमनेर चंदनपुरी घाटात बुधवारी पहाटे 10 वी 12 वी च्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग लागली. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. 

हा टेम्पो भोपाळ वरून पुण्याकडे येत असताना ही दुर्घटना घडली. ‘द बर्निंग’ टेम्पो थरार येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांनी अनुभवला.

शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी संगमनेरमध्ये दाखल झाले त्यानंतर त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य त्या सूचना दिल्या.