Zomato CEO दीपिंदर गोयल यांना अब्जाधीशांच्या यादीत स्थान; किती आहे एकूण संपत्ती?

Deepinder Goyal Becomes Billionaire: झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी अब्जाधीशांच्या यादीत स्थान पटाकवलंय. त्यांच्या एकूण संपत्तीत 8300 कोटींची वाढ झालीय.   

नेहा चौधरी | Jul 15, 2024, 14:15 PM IST
1/7

प्रसिद्ध फूट डिलिव्हरी स्टार्टअप झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल यांनी अब्जाधीश होण्याचा बहुमान पटकावलंय. 

2/7

झोमॅटोच्या समभागांनीही आज 15 जुलैला बीएसईवर एक नवीन विक्रम केलाय. कंपनीचा समभाग 2 टक्क्यांनी वाढून 230 रुपयांवर पोहोचल्यामुळे त्याने नवा उच्चांक पटकावलाय. कंपनीचा बाजार आता 1.8 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलाय. 

3/7

41 वर्षीय गोयलकडे झोमॅटोमध्ये 36.95 कोटी शेअर्ससह 4.24% स्टेक आहेत. त्यामुळे 8,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक व्यवस्थापकचा मान गोयलला मिळालाय. 

4/7

गोयल यांनी आयआयटी दिल्लीतून गणित आणि संगणनात पदवी घेतलीय. खाद्य पदार्थांच्या आवडीमुळे प्रेरित होऊन, त्यांनी खाद्यपदार्थ ऑर्डर करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी FoodieBay.com ची सह-स्थापना केली. ज्याचे नंतर Zomato.com असं नाव देण्यात आलं. 

5/7

2011 मध्ये इन्फो एज कडून प्रारंभिक निधीसह, गोयल यांनी झोमॅटोच्या वाढीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी नोकरीचा त्याग केला. या काळात झोमॅटो कंपनीने भारतातील अन्न तंत्रज्ञान उद्योगात झपाट्याने यश मिळवत असताना आज ती एक मोठी कंपनी म्हणून उदयास आलीय.

6/7

गोयलने आत्तापर्यंत शेफकार्ट आणि अनॅकॅडमी यासारख्या 16 स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केलीय. एक संस्थापक आणि सीईओ म्हणून आपल्या प्रवासात गोयलने फक्त स्वतःसाठी नावच नाही तर प्रचंड पैसाही कमावलाय. 

7/7

अब्जाधीश मान पटकावणारा गोयल कंपनीचा प्रचार करण्यासाठी ते अनेकदा ग्राहकांना फूड डिलिव्हरी करतात. त्याशिवाय तो पगारही घेत नाही असं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात येतं.