पावसाळ्यात आवर्जून खा आरोग्यदायी हंगामी भाज्या, अनेक पोषकतत्वांनी समृद्ध

Rainy Season Vegetables : पावसाळा सुरु झाला की, खाण्याची चंगल असते. गरमा गरम कुरकुरीत भजी ते अगदी पावसाळ्यातील रानभाज्यांपर्यंत सगळंच असतं. या रानभाज्यांचे पोषकतत्त्व समजून घ्या. 

| Jul 15, 2024, 12:45 PM IST

Rainy Season Vegetables : पावसाळ्यात मज्जा असते ती खवय्यांची. या दिवसांमध्ये रानभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. एवढंच नव्हे तर अळू देखील या दिवसात मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. पावसाळ्यात मिळणाऱ्या या रानभाज्यांबद्दल जाणून घेऊया. 

1/9

टाकळा

टाकळा ही भाजी फक्त पावसाळ्यात मिळते. या भाजीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. एवढंच नव्हे तर श्वसन सुधारते एवढंच नव्हे तक पचनासही मदत होते. कमी कॅलरी आणि फायबरचा चांगला स्त्रोत म्हणून या भाजीकडे पाहिलं जातं. जीवनसत्त्वे, A,C, फोलेटने समृद्ध अशी भाजी आहे. 

2/9

फोडशी

फोडशी ही देखील उत्तम चवीची रानभाजी आहे. अँटिऑक्सिडंट्स समृद्ध असलेल्या या भाजीने पचन सुधारते. तसेच प्रतिकारशक्ती देखील वाढते. कमी कॅलरी, जास्त फायबर आणि जीवनसत्त्वे A, C, कॅल्शियम आणि लोह्याने समृद्ध असते. 

3/9

शेवळा

रानभाजी शेवळा ही अतिशय दुर्मिळ भाजी आहे. पावसाळ्यातील या रानभाजीने हृदयाचे आरोग्य सुधारते. पावसाळातील सगळ्यांच भाज्यांमुळे पचनक्रिया चांगली होते. ही भाजी रक्तातील साखरेचे नियमन करते. तसेच ही भाजी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. कमी कॅलरी, जास्त फायबर आणि पोटॅशियम समृद्ध अशी भाजी आहे. 

4/9

करटोळी

कारल्याचा छोटा भाऊ म्हणून करटोळी या भाजीकडे पाहिलं जातं. शरीला डिटॉक्स करण्यासाठी ही भाजी महत्त्वाची आहे. यकृताचे आरोग्य राखण्यास करटोळी खावे. कमी कॅलरी, प्रतिकारशक्ती वाढवणे आणि जास्त फायबर असे गुण या करटोळी भाजीत आहे.

5/9

दोडका

बाराही महिने मिळणारी ही भाजी पावसाळ्यात आवर्जून खावी. कारण या भाजीत वजन कमी करण्यासाठी आवश्यक ते गुणधर्म असतात. तसेच यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते आणि पावसात पचनक्रिया थंडावते. अशावेळी ही भाजी उत्तम स्त्रोत आहे. 

6/9

मुळा

मुळा देखील बाराही महिने मिळतो. पण पावसाळ्यातील मुळा हा तुमचं आरोग्य सुधारण्यास मदत करतो. कमी कॅलरी, जास्त फायबर आणि आवश्यक ती सगळी जीवनसत्त्वे यामध्ये असतात. 

7/9

कच्चे टोमॅटो

कच्चे टोमॅटो पावसात मोठ्या प्रमाणात मिळतात. अँटिऑक्सिडंटने समृद्ध हृदयाच्या आरोग्यास समर्थन देते. तसेच यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारते. या भाजीत कमी कऐलरी असून जास्त पाणी असते. त्यामुळे टोमॅटोची भाजी किंवा चटणी खाऊ शकता. 

8/9

दुधी भोपळा

शरीराला हायड्रेट राहण्यासाठी दुधी भोपळा खावा. तसेच हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. वजन कमी करायचे असेल तर दुधी भोपळा आहारात नक्की घ्या. भाजी, थेपले, मुठीयाच्या पद्धतीने दुधी भोपळा खाऊ शकता. 

9/9

कच्ची पपई

पपई हा आरोग्यासाठी चांगलाच असतो. पण कच्चा पपई देखील आहारात असणे फायदेशीर ठरते. पचनक्रिया सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते. जीवनसत्त्वे देखील मोठ्या प्रमाणात असते.