3 तासांचा बोरिंग चित्रपट, शाहरुख खानही बॉक्स ऑफिसवर करु शकला नाही चमत्कार, मात्र, IMDb रेटिंग जबरदस्त

शाहरुख खानचा 3 तासांचा सर्वात जास्त कंटाळवाना चित्रपट. बॉक्स ऑफिसवर ठरला सर्वात फ्लॉप चित्रपट. मात्र, IMDb रेटिंग आहे जबरदस्त. 

Soneshwar Patil | Jan 24, 2025, 15:52 PM IST
1/7

बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणाऱ्या शाहरुख खानने आपल्या 33 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  त्यापैकी काही हिट तर काही ब्लॉकबस्टर ठरले. 

2/7

पण आज आम्ही तुम्हाला शाहरुख खानच्या त्या अतिशय कंटाळवाण्या चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो 25 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर तो चित्रपट खूप फ्लॉप ठरला होता. 

3/7

1992 मध्ये 'दीवाना' या चित्रपटाद्वारे शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शाहरुख खानचा हा चित्रपट 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे नाव 'हे राम' होते.

4/7

हा चित्रपट भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलींवर आधारित होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. चित्रपटात शाहरुख सहाय्यक भूमिकेत दिसला होता. 

5/7

या चित्रपटात राणी मुखर्जी, हेमा मालिनी, ओम पुरी, अतुल कुलकर्णी, विक्रम गोखले, सौरभ शुक्ला आणि मनोज यांसारखे कलाकार या चित्रपटात दिसले होते.

6/7

या चित्रपटामुळे बराच वाद झाला होता. शाहरुख खानने या चित्रपटात पठाणी मुस्लिमाची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी शाहरुखने कोणतीही फी घेतली नव्हती. 

7/7

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप ठरला. तरी देखील या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. परंतु या चित्रपटाला IMDbवर 10 पैकी 8 उत्कृष्ट रेटिंग मिळाले आहे.