Dohaचे सौंदर्य पाहून डोळे दीपवून जातील, नवीन - जुन्या संस्कृतीचा हा अनोखा मेळ

Beauty of Doha  : दोहा म्हटले की डोळ्यासमोर वाळवंट उभा राहतो. मात्र, आता तिथे गेल्यावर वेगळाच नजराणा पाहायला मिळतो. या ठिकाणी एकेकाळी सर्वत्र वाळूचा महासागर होता, आज हा भाग गगनचुंबी इमारतींनी फुललेला दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा एखादा पर्यटक येथे जातो तेव्हा त्याला चकाचक इमारती दिसतात. हीच कतारची राजधानी दोहा, असल्याचे लक्षात येतात येथील सौंदर्याच्या प्रेमात तो पडतो.

| May 04, 2023, 11:32 AM IST

.

1/5

Beauty of Doha  : तुम्ही जर फिरण्याचा बेत आखात असाल तर आखातामधील कतारला अवश्य भेट दिली पाहिजे. कारण येथील सौंदर्य पाहून तुमचे डोळे दीपवून जातील. आज कतारला भेट देण्यासाठी लांबून लांबून पर्यटक येतात. हा देश एकेकाळी अरब देशांच्या निर्बंधांशी झगडत होता, पण आज येथील लोकांचे उत्पन्न जगातील अनेक देशांतील लोकांपेक्षा जास्त आहे आणि हा देश प्रगतीच्या वाटेवर आहे. दोहा हे कतारमधील सर्वात मोठे शहर आहे. कतारचा जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत समावेश आहे आणि येथे भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत.

2/5

Beauty of Doha  : कधी तुम्ही तुम्ही कतारला गेला तर तेथील राष्ट्रीय संग्रहालयाला भेट द्या. कतारचे हे संग्रहालय आपला सांस्कृतिक वारसा जपत आहे. कतारच्या पारंपारिक कला, संस्कृती आणि इतिहासाची ओळख करुन घ्यायची असेल, तर इथे अवश्य भेट दिलीच पाहिजे.

3/5

Beauty of Doha  : कतारला फिरायला जाल तेव्हा तिथल्या इस्लामिक आर्ट म्युझियमला ​​भेट द्या. जगभरातील कला इथे पाहायला मिळतात. या संग्रहालयाची स्थापना 2008 मध्ये झाली. येथे तुम्हाला 7व्या ते 19व्या शतकातील कला पाहायला मिळतील. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे येथे कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

4/5

Beauty of Doha  : कतार आणि दोहा येथील अनेकांना रस्त्यावर फिरताना अनेक गोष्टी नजरेत भरतील. सुंदर लेनसाठी तुम्ही साकू वाकीफला जाऊ शकता. जिथे तुम्हाला अनेक पुरातन वस्तू पाहायला मिळतील. येथील बाजार परफ्यूम आणि मसाल्यांसाठी जगप्रसिद्ध आहे.

5/5

Beauty of Doha  : कतारमध्ये तुम्हाला प्राचीन आणि नवीन संस्कृतीचा अनोखा मिलाफ पाहायला मिळतो. येथे तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेल्या इमारतीही पाहायला मिळतील आणि ऐतिहासिक वारसाही जपलेला पाहायला मिळेल.