105 कोटी रोख, 74 कोटींची दारू आणि 81 कोटींचं सोनं जप्त... मतदानाआधी कर्नाटक पोलिसांची मोठी कारवाई

Karnataka Elections 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणूकीला आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. त्यामुळे कर्नाटकात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. येत्या दहा मे रोजी 224 जागांसाठी मतदान (Voting) होणार असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आमिषं दाखवली जात आहेत. निवडणूक आयोगाने  (Election Commission) आतापर्यंत राज्यातील विविध भागातून रोख रकमेसह (Cash) दारू (Alcohol), अंमलीपदार्थ (Drugs), दागिने (Gold) जप्त केले आहेत. 

| May 03, 2023, 21:51 PM IST
1/5

कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी येत्या दहा मे रोजी मतदान होणार असून तेरा मे रोजी मतमोजणी होणार आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आमिष दाखवली जात आहेत. राज्यातील विविध भागातून निवडणूक आयोगाने रोख रक्कम, दारू, दागिने जप्त केले आहेत. 

2/5

2018 च्या विधानसभा निवडणुकीवेळी निवडणुक आयोगाने 83 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. पण यावेळी तब्बल 300 कोटी रुपयांहून अधिकाच मुद्देमाल जप्त केला आहे. 

3/5

आतापर्यंत निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईत 110 रुपयांची रोख रक्कम, 74 कोटी रुपयांची दारू, 81 कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, 18 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. 

4/5

निवडणूक आयोगाने आतापर्यंत तब्बल 2346 एफआयआर दाखल केले आहेत. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी मार्च महिन्यात एका कारवाईत 58 कोटींची रक्कम जप्त करण्यात आलीहोती. 

5/5

मुख्य निवडणूक आयुक्तांनी राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विशेषता सीमा भागावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. नियमांचं उल्लंघन करण्यांवर कठोर कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत.