'तुम्ही आमच्या बेडरुममध्ये...'; करिनाचा हात पकडून जाताना सैफ कोणावर एवढा संतापला?

Saif Ali Khan Talks About Bedroom: सैफ अली खान आणि त्याची पत्नी तसेच अभिनेत्री करिना कपूर हे कायमच चर्चेत असतात. या दोघांच्या एका व्हिडीओसंदर्भात सैफ अली खानने आपली भूमिका स्पष्टपणे मांडताना नक्की काय घडलेलं याबद्दल सांगितलं आहे. नेमकं सैफ काय म्हणालाय पाहूयात...

| Oct 02, 2024, 10:30 AM IST
1/11

saifalikhankareenakapoor

सैफ अली खानने एका जाहीर मुलाखतीमध्ये नेमकं काय घडलं याबद्दलची माहिती दिली. तो पत्नी करिना कपूरबरोबरच मुलांचा उल्लेख काय म्हणाला पाहूयात...

2/11

saifalikhankareenakapoor

कलाकार आणि पापाराझींचे खटके उडल्याचं यापूर्वी अनेकदा पहायला मिळालं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्याबरोबर तर अनेकदा या फोटोग्राफर्सचा वाद होतो. अनेकदा जया बच्चन यांना अशाप्रकारे बेसावध क्षणी फोटोग्राफर्सने फोटो काढलेलं आवडत नाही आणि त्या सरळ त्यांच्यावर चिडतात.  

3/11

saifalikhankareenakapoor

केवळ जया बच्चनच नाही तर इतरही अनेक सेलिब्रिटी मग त्या अभिनेत्री असोत किंवा अभिनेते अशाप्रकारे वाटेल तिथे फोटो काढणाऱ्या पापाराझींवर प्रचंड संतापतात. मात्र याच पापाराझींबरोबरचे आपले अनुभव नुकतेच अभिनेता सैफ अली खानने एका जाहीर कार्यक्रमामध्ये सांगितले. यावेळेस त्याने एकदा करिनाबरोबर जाताना चक्क या फोटोग्राफर्सला बेडरुममध्ये येण्यास सांगितल्याच्या किस्स्यावरही स्पष्टीकरण दिलं.

4/11

saifalikhankareenakapoor

पापाराझींबरोबर तुझं नातं कसं आहे? खरं तर तू या पापाराझींकडे कसं पाहतो? या प्रश्नांवर सैफ बोलत होता. पापाराझींबद्दल बोलताना सैफने, "अर्ध्याहून अधिक वेळा कलाकारच पापाराझींना फोन करुन बोलवतात आणि सांगतात की आमचे फोटो घ्या. हे एक प्रकारचं देवाण-घेवाणीचं नातं असतं. याला काही हरकत नाही. हे उत्तम आहे. मात्र मला हे आवडणार नाही की मी पायजमा घालून खाली उतरलोय, माझ्या मुलाबरोबर खेळतोय. असं असतानाच अचानक कोणी फोटो काढत असेल तर तसा कोणी फोटो काढलेलं मला तरी आवडणार नाही," असं मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

5/11

saifalikhankareenakapoor

"मी तयार होऊन जात असेल, सूट-बूट घातलेल्या पेहरावात असेल तर मला फोटो द्यायला काही वाटतं नाही. खरं तर भारतीय पापाराझी हे फार शांत असतात. ते समजून घेतात. तुम्ही त्यांना फोटो काढू नका असं सांगितलं तर ते ऐकतात," असंही सैफ या फोटोग्राफर्सचं कौतुक करताना म्हणाला. 

6/11

saifalikhankareenakapoor

"ते जेव्हा आमची मुलं कारमध्ये असताना त्यांचा पाठलाग करतात फोटोंसाठी तेव्हा जरा भिती वाटते. मात्र आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो त्याचा विचार केला तर हे सारं त्याचा एक भाग आहे. मात्र मला नाही वाटत की आपल्याकडचे पापाराझी हे इंग्लंड किंवा अमेरिकेसारखे आहेत. तिथे फारच लाज वाटतील असे फोटो छापले जातात. खरं तर पापाराझींचं हेच काम असतं. पण आपल्या भारतात प्रकरण वेगळं आहे. आमचं या पापाराझींबरोबर चांगलं नातं आहे," असं सैफने पाश्चिमात्य आणि भारतीय फोटोग्राफर्समधील फरक सांगताना म्हटलं. 

7/11

saifalikhankareenakapoor

पापाराझी बिझनेसमधील पैसा हा खरोखरच थक्क करणारा आहे. कधीतरी तुम्हीच त्यांना बोलवून घेतात. मला वाटतं काही लोक यासाठी त्यांना पैसेही देतात. मात्र माझ्या कुटुंबातील कोणीही कधीही या फोटोग्राफर्सला पैसे देऊन बोलावलेलं नाही, असं सैफने स्पष्ट केलं.

8/11

saifalikhankareenakapoor

पापाराझींचे रेट कार्ड असतात. काही विशिष्ट सेलिब्रिटींच्या फोटोंसाठी त्यांना फार पैसे मिळतात. यामध्ये माझ्या एका मुलाचाही समावेश आहे. हे फार मजेदार पण त्याचवेळी वडील म्हणून व्यथित करणारं आहे, असंही सैफ म्हणाला. 

9/11

saifalikhankareenakapoor

एकदा मी पाहिलं होतं की तू पापाराझींना म्हणाला होता, 'तुम्हाला माझ्या बेडरुममध्ये यायचं आहे का?' हे नेमकं काय घडलेलं? असा प्रश्न सैफला विचारण्यात आला होता. यावरुन सैफने एकंदरित सविस्तर भाष्य केलं होतं.

10/11

saifalikhankareenakapoor

"खरं तर कॅमेरा तुमच्यावर असतो तेव्हा काय होईल हे तुम्हाला सांगता येत नाही. हे बेडरुमसंदर्भातील वक्तव्याचं प्रकरण तेव्हा घडलं होतं आम्ही रात्री उशीरा एका पार्टीवरुन आलो होतो," असं म्हणत सैफने नेमकं काय घडल्याने त्याने फोटोग्राफर्सला थेट बेडरुममध्ये येण्यासंदर्भात विचारलं होतं याचा पूर्ण किस्सा 'इंडिया टुडे मुंबई कॉनक्लेव्ह 2024'च्या कार्यक्रमामधील मुलाखतीत उलगडून सांगितला.  

11/11

saifalikhankareenakapoor

"आमच्या मागोमाग त्यावेळी गेटमध्ये 25 पापाराझी कॅमेरा घेऊन शिरले. ते पुढे इमारतीच्या कम्पाऊण्डमध्ये आले. त्यानंतर ते इमारतीच्या लॉबीमध्ये शिरले. त्यापुढे तर पुढील टप्पा बेडरुमच होता.त्यामुळेच मी म्हणालो की, तुम्ही लोक आत आमच्या बेडरुममध्ये का येत नाही?" असं सैफने सांगितलं. सैफ ज्यावेळी हे म्हणाला त्यावेळी तो करिनाचा हात पकडून चालत होता.