जगातल्या 'या' देशात झाडांवर उगतं 'सोनं', 1 किलो सालीची किंमत ऐकून डोळे विस्फारतील!

चीनमधील एका शहरात झाडांवर 'सोने' उगवते हे तुम्हाला माहिती आहे का? नेमका काय आहे हा प्रकार? जाणून घेऊया.

Pravin Dabholkar | Jan 25, 2025, 10:58 AM IST

tangerine peel in Xinhui: चीनमधील एका शहरात झाडांवर 'सोने' उगवते हे तुम्हाला माहिती आहे का? नेमका काय आहे हा प्रकार? जाणून घेऊया.

1/11

जगातल्या 'या' देशात झाडांवर उगतं 'सोनं', 1 किलो सालीची किंमत ऐकून डोळे विस्फारतील!

World Expensive Tree tangerine peel in Xinhui city uses Purpose

चीनमधील एका शहरात झाडांवर 'सोने' उगवते हे तुम्हाला माहिती आहे का? येथील जुने टेंजेरिनचे साल सुमारे ८ लाख रुपये प्रति किलोला विकले जाते. नेमका काय आहे हा प्रकार? जाणून घेऊया.

2/11

चीनमधील शिनहुई शहरात टेंजेरिन उत्पादन

World Expensive Tree tangerine peel in Xinhui city uses Purpose

चीनमधील शिनहुई शहरात मोठ्या प्रमाणात टेंजेरिन फळांचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये विशेष पोषक तत्व असतात आणि त्यांची साले जगभरात मौल्यवान मानली जातात.

3/11

जुन्या टेंजेरिनच्या सालीची किंमत

World Expensive Tree tangerine peel in Xinhui city uses Purpose

येथील जुन्या टेंजेरिनच्या सालींची किंमत खूप जास्त आहे. 1 किलो जुन्या सालींची किंमत सुमारे 8 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते. ज्यामुळे याची तुलना सोन्याच्या बरोबर केली जाते.

4/11

चीनमध्ये टेंजेरिनच्या सालीचा इतिहास

World Expensive Tree tangerine peel in Xinhui city uses Purpose

12 व्या शतकापासून चीनमध्ये पारंपारिक औषधांमध्ये टेंजेरिनच्या सालींचा वापर केला जात आहे. रक्तदाब आणि लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी ही साले विशेषतः उपयुक्त मानली जातात.

5/11

चेनपी (जुन्या साली) चे महत्त्व

World Expensive Tree tangerine peel in Xinhui city uses Purpose

जुन्या टेंजेरिनच्या सालींना चेन्पी म्हणतात. बीजिंगच्या फॉरबिडन सिटीमध्ये सम्राटांच्या पाककृतींमध्ये त्यांचा वापर केला जात असे आणि आजही पारंपारिक औषधांमध्ये वापरले जाते.

6/11

सालींच्या गुणवत्तेचे महत्त्व

World Expensive Tree tangerine peel in Xinhui city uses Purpose

टेंजेरिनची साले जितकी जुनी आणि कोरडी असतील तितकी त्यांची किंमत जास्त असेल. ही साले थंडीत, उन्हात वाळवली जातात. ज्यामुळे त्यांची गुणवत्ता आणि किंमत वाढते.

7/11

माती आणि पाण्याचा परिणाम

World Expensive Tree tangerine peel in Xinhui city uses Purpose

रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, शिनहुईच्या माती आणि पाण्याच्या वैशिष्ट्यांमुळे टेंजेरिनच्या सालींना अधिक पोषक तत्वे मिळतात. ज्यामुळे हे टेंजेरिन इतर ठिकाणच्या फळांपेक्षा चांगले बनतात.

8/11

चेनपीचा वापर

World Expensive Tree tangerine peel in Xinhui city uses Purpose

चेनपीचा वापर  पारंपारिक औषधांमध्ये केला जातो. तसेच दारू बनवण्यासाठी देखील वापरला जातो. याशिवाय विविध खाद्यपदार्थ आणि घरगुती उपचारांमध्ये देखील याचा वापर केला जातो.

9/11

2023 मध्ये सालींची किंमत

World Expensive Tree tangerine peel in Xinhui city uses Purpose

2023 मध्ये एक किलो वाळलेल्या टेंजेरिनच्या सालीचा लिलाव सुमारे 9 हजार 646 अमेरिकन डॉलर्समध्ये झाला. या सालांच्या विक्रीतून त्या वर्षी 13.8 अब्ज डॉलर्सचा महसूल मिळाला. जो शिनहुईच्या आर्थिक वाढीमध्ये मोठा वाटा होता.

10/11

व्यवसायाचा विस्तार

World Expensive Tree tangerine peel in Xinhui city uses Purpose

शिनहुई येथील व्यावसायिक ली यांनी 1996 मध्ये व्यवसाय सुरू केला आणि आज हा परिसर चेनपी उत्पादन आणि व्यापाराचे एक प्रमुख केंद्र बनला आहे. आता येथे दरवर्षी 163 टन चेनपीचे उत्पादन होते.

11/11

स्थानिक जीवनात चेनपीचा वापर

World Expensive Tree tangerine peel in Xinhui city uses Purpose

येथील लोक त्यांच्या अन्नपदार्थांपासून ते दारू बनवण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये चेनपीचा वापर करतात. ते त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे.