नीरज चोप्रा मराठा? पानिपतच्या युद्धाशी खास कनेक्शन? पण यात तथ्य किती?

Neeraj Chopra Maratha Connection: वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेमध्ये नीरज चोप्राने जेतेपदावर नाव कोरल्यानंतर जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यापूर्वी ऑपिम्पिक 2020 मध्ये सुवर्णपदावर नाव कोरल्यानंतरही नीरजची जगभरामध्ये चर्चा झाली होती. यावेळी नीरज मराठा असल्याच्या मुद्द्यावरुनची बरीच चर्चा झालेली. आता पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात नेमकी ही मराठा कनेक्शनची चर्चा काय आहे...

Swapnil Ghangale | Aug 28, 2023, 17:02 PM IST
1/13

Neeraj Chopra Maratha Connection

ऑपिम्पिक 2020 मध्ये सुवर्णपदावर नाव कोरणारा भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नीरज चोप्राने वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 मध्ये (World Athletics Championships) सुवर्णपदक जिंकलं आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. नीरज चोप्राने 88.17 मीटर दूर भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं.

2/13

Neeraj Chopra Maratha Connection

नीरजने केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. असं असतानाच दुसरीकडे नीरजसंदर्भात अनेक गोष्टींबद्दल शोध घेतला जात आहे. दरम्यान सोशल मीडियावर पुन्हा एकदा नीरज चोप्रा हा हरियाणामधील रोड मराठा समाजातील असल्याच्या मुद्दाही चर्चेत आला आहे.

3/13

Neeraj Chopra Maratha Connection

मात्र नीरज खरोखरच मराठा आहे का याबद्दल माहिती घेतली असता एका मुलाखतीमध्ये त्याचा असा उल्लेख केल्याचं आढळून येतं. ‘हिंदुस्थान टाइम्स’ला काही वर्षांपूर्वी नीरजने दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीमध्ये यासंदर्भातील एक उल्लेख सापडतो. तरी 2021 च्या अन्य एका मुलाखतीमध्ये याच्या उलट दावा सापडतो.

4/13

Neeraj Chopra Maratha Connection

नीरजने दिलेल्या या मुलाखतीमध्ये त्याने नीरज हा रोड मराठा असल्याचा उल्लेख केला आहे. “काही शतकांआधी त्याचे (नीरजचे) पूर्वज हरियाणामध्ये स्थलांतरीत झाले. बाजीराव पेशव्यांनी पानिपतमध्ये लढलेल्या तिसऱ्या लढाईमध्ये ते लढले होते," असा उल्लेख नीरजच्या पूर्वजांबद्दल बोलताना आहे.

5/13

Neeraj Chopra Maratha Connection

नीरज हा भालाफेकमध्ये निपुण असल्याचा संदर्भतही त्याच्या पूर्वजाशी जोडण्यात आला होता. "नीरज हा याच रोर मराठ्यांचा वंशज असून भालाफेक या पूर्वापार चालत आलेल्या कौशल्याच्या मदतीने तो सध्या आपल्या पूर्वजांची परंपरा पुढे नेत आहे,” असं या मुलाखतीच्या सुरुवातीला म्हटलं आहे. 

6/13

Neeraj Chopra Maratha Connection

28 ऑगस्ट 2021 रोजी 'अल्ट न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार नीरज आणि त्याच्या नातेवाईक मराठ्यांशी आपला काही संबंध आहे असं आम्हाला पूर्वजांनी सांगितलेलं नाही, असं म्हटलं आहे. नीरजचा मॅनेजर अमन शाहाच्या माध्यमातून नीरजचे आजोबा धर्मसिंग चोप्रा यांच्याशी आणि धाकटे चुलते सुरेंद्र कुमार यांच्याशी चर्चा केली.

7/13

Neeraj Chopra Maratha Connection

नीरज हा आजोबा आणि धाकट्या काकांबरोबर हरियाणामधील पानीपत जिल्ह्यातील खंडारा गावामध्ये राहतो.

8/13

Neeraj Chopra Maratha Connection

सुरेंद्र यांनी यासंदर्भात बोलताना, "नीरजचं यश हे कोणत्याही जातीच्या किंवा राजकीय दृष्टीकोनातून पाहता कामा नये. त्याने भारतीय म्हणून पदक जिंकला आहे," असं 2021 मध्ये नीरजने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर म्हटलं होतं. 

9/13

Neeraj Chopra Maratha Connection

"आम्ही हरियाणामधील रोर समाजाचे आहोत. या सामाजातील काही घटकांचं असं माननं आहे की त्यांचे पूर्वजांचा मराठा समाजाचे आहेत. मात्र बहुतांश रोर समाजातील लोक असं मानत नाहीत. आम्हीही त्यापैकीच आहोत," असं सुरेंद्र यांनी म्हटलं. 

10/13

Neeraj Chopra Maratha Connection

नीरजचे आजोबा धर्मवीर यांनी, "मी माझ्या वडिलांबरोबर आणि आजोबांबरोबर माझं बालपण घालवलं हे माझं नशीब आहे. ते दोघेही शेतकरीच होते. मात्र त्या दोघांपैकी कोणतीही आपला मराठ्यांशी संबंध असल्याचं कधी सांगितलं नव्हतं," असं 'अल्ट न्यूज'ला सांगितलं होतं.

11/13

Neeraj Chopra Maratha Connection

नीरजचे काका सुरेंद्र यांनी, "2 दशकांपूर्वी रोर मराठा हा फारसा चर्चेत नसलेला विषय होता. मात्र मागील काही काळापासून मतांच्या राजकारणामुळे तो चर्चेत आला आहे. मात्र मराठ्यांशी संबंध असल्याच्या दाव्यांवर विश्वास नसलेल्या रोर समाजाला आपली भूमिका स्पष्ट करावी लागते," असं म्हटलं. 

12/13

Neeraj Chopra Maratha Connection

"आम्ही आमच्या रोर मराठा मित्रांच्या संमेलनामध्ये त्यांना मराठा असं संबोधतो कारण आम्ही त्यांच्या भावनांचा आदर करतो. ते सुद्धा त्याचप्रकारे आमच्या भावनांचा आदर करतात. मात्र रोर मराठा समाजातील काही घटकांचा असा आग्रह आहे की आम्ही मराठ्यांशी संबंध असल्याचं मान्य करावं, नीरजने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर हे दावे वाढले आहेत," असंही सुरेंद्र म्हणाले. 

13/13

Neeraj Chopra Maratha Connection

त्यामुळेच रोर समाज हा मराठ्यांशी संबंध असल्याचं या सामजातील काही घटक मानत असले तरी नीरजचे कुटुंबीय स्वत: हे मान्य करत नाही असं त्याच्या काकांनी आणि आजोबांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन हे स्पष्ट होत आहे.