शनिदोषापासून मुक्तीसाठी श्रावण सोम प्रदोष व्रताला करा 'हे' विशेष उपाय, आर्थिक स्थितीदेखील होईल मजबूत

Sawan Pradosh Vrat 2023 : आज श्रावण सोमवार आणि प्रदोष व्रत एकत्र जुळून आले आहेत. त्यासोबत आज 5 शुभ योग जुळून आले आहेत. अशात शनिदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी प्रदोष व्रताला उपाय करा. 

Aug 28, 2023, 11:59 AM IST

Sawan Pradosh Vrat 2023 : जो प्रदोष व्रत सोमवारी येतं त्याला सोम प्रदोष व्रत असं म्हणतात. आज श्रावण सोमवारसोबत सोम प्रदोष व्रतदेखील पाळलं जातं आहे. पंचांगानुसार द्वादशी आणि त्रयोदशी तिथी आहे.  

1/7

 आज सौभाग्य योग, आयुष्मान योग, सर्वार्थ अमृत सिद्धी योग आणि रवि योग आहे. या योगात शनिदोषापासून मुक्तीसाठी उपाय केल्यास लाभ होतो. 

2/7

लग्नासाठी उपाय

सोम प्रदोष व्रताला ‘ॐ पार्वतीपतये नमः’ या मंत्राचा 11 वेळा जप करा. संध्याकाळी हा जप करावा. या मंत्राच्या जपामुळे माता गौरी आणि भगवान शंकर प्रसन्न होतात. 

3/7

कौटुंबिक समस्यावर उपाय

कौटुंबिक समस्या दूर करण्यासाठी आज संध्याकाळी शुभ योगामध्ये ‘ॐ हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट्’  या मंत्राचा जप करावा. या उपायाने सर्व कौटुंबिक अडथळे आणि दुःख दूर होतात, अशी मान्यता आहे. 

4/7

ग्रह दोष दूर करण्यासाठी

एक ग्रह दोष दूर करण्यासाठी ‘ॐ नमः शिवाय गङ्गाधराय’ या मंत्राच जप करा. या मंत्रामुळे तुमचं कामावरील फोकस वाढले आणि काम चांगल होईल. 

5/7

आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी उपाय

आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी संध्याकाळी शुभ योगामध्ये ‘ॐ नमः शिवाय शान्ताय’ या मंत्राचा 11 वेळा जप करा. या उपायामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. 

6/7

शनिदोष उपाय

शनिदोष, शनिसाडेसाती पासून आराम मिळवण्यासाठी शिवलिंगावर जल अर्पण करा. 

7/7

शनि साडेसातीसाठी उपाय

कर्क, वृश्चिक, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी शिवलिंगावर दूध अर्पण केल्यास त्यांना भोलेनाथाचा आशिर्वाद मिळतो. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)