पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतरही लक्षद्वीपमध्ये पर्यटकांची संख्या वाढेना; 'हे' आहे कारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या लक्षद्वीप दौऱ्याची जगभरात चर्चा झाली होती. त्यानंतर लक्षद्वीप जगभरात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केले जाणारे ठिकाण बनले आहे. दुसरीकडे मालदीवने याचा निषेध केला. याचा विरोध म्हणून अनेक सेलिब्रिटींनी लक्षद्वीपला जाण्यास प्रोत्साहन दिलं होतं. मात्र आता याऊलट होताना दिसत आहे.

Feb 26, 2024, 18:08 PM IST
1/9

PM Modi at lakshadweep

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लक्षद्वीपला भेट दिली होती. यानंतर लक्षद्वीप पर्यटनाबाबत सोशल मीडियावर अनेक ट्रेंड आले आणि देशातील सेलिब्रिटींनी या विषयावर आपले मत मांडले.

2/9

PM Modi lakshadweep photos

पंतप्रधान मोदींनी सुंदर फोटोही पोस्ट केले होते. हे फोटो मालदीवसाठी इशारा मानले जात होते. मालदीवच्या मंत्र्याने पंतप्रधान मोदींच्या या फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट केली होती, ज्यानंतर त्यांना रोषाला सामोरं जावं लागलं.

3/9

PM Modi lakshadweep

दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर आणि येथे पर्यटनासाठी बोलावल्यानंतर येथे जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र ही वाढ अत्यंत किरकोळ आहे. 

4/9

sudden increase in tourists in Lakshadweep is not possible

कारण लक्षद्वीपमध्ये पर्यटकांची अचानक वाढ होणे शक्य नाही. यामागे अनेक कारणे आहेत. डीजीसीएच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास जानेवारी महिन्यात 2312 लोक कोचीहून अगस्ती विमानतळावर पोहोचले होते.

5/9

lakshadweep tourist number

तर डिसेंबरमध्ये 2253 लोक कोचीहून अगस्तीला गेले होते. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, जानेवारीमध्ये अगस्ती विमानतळावर 4491 लोक आले.

6/9

lakshadweep tourism

मात्र आता अगस्ती गाठणाऱ्यांची संख्या का वाढली नाही? याचं कारण समोर आलं आहे. खरं म्हणजे आत्तापर्यंत अगस्तीसाठी एकच फ्लाइट आहे.

7/9

airplane booking

त्याची बुकिंग देखील झटक्यात संपते. त्यामुळे शोध घेतल्यानंतर कोणतीही फ्लाइट उपलब्ध नसते. अशा स्थितीत काहीच लोकांना लक्षद्वीपला जाता येते.

8/9

indigo airline

आता इंडिगोनेही कोची ते अगस्ती अशी हवाई सेवा सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. इंडिगो मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या सुरुवातीपासून लक्षद्वीपसाठी हवाई सेवा सुरू करू शकते. स्पाईसजेटनेही अगस्तीला विमान सेवा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

9/9

lakshadweep hotels

अगस्तीसाठी विमान सेवा वाढल्या तर तेथे पोहोचणाऱ्यांची संख्याही वाढेल. तिथे पुरेशा प्रमाणात हॉटेल्स आणि इतर सुविधाही असणे आवश्यक आहे. टाटा समूहानेही 2026 पर्यंत लक्षद्वीपमध्ये दोन रिसॉर्ट तयार करण्याची तयारी केली आहेत.