पहिल्या लग्नाच्या अवघ्या सात महिन्यांनी शाहीन शाह आफ्रिदी दुसऱ्यांदा लग्न करणार; कारण पाहाच

Shaheen Shah Afridi Getting Married : तिथे मात्र संघातील एका खेळाडूच्या खासगी आयुष्यानं सर्वांच्याच नजरा वळवल्या आहेत. हा खेळाडू आहे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी.   

Sep 14, 2023, 17:01 PM IST

Shaheen Shah Afridi Getting Married : इथं भारतीय संघाच्या हातून पराभूत झालेला पाकिस्तानचा संघ आशिया चषकाच्या स्पर्धेत अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. 

 

1/7

पाकिस्तान क्रिकेट संघ

Why Is Shaheen Shah Afridi Getting Married For The Second Time know the reason

Shaheen Shah Afridi Getting Married : आशिया चषक स्पर्धेदरम्यानच पाकिस्ताचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याच्या लग्नाची बातमी आली आणि अनेकांच्याच भुवया उंचावल्या.     

2/7

शाहीन लग्न करतोय?

Why Is Shaheen Shah Afridi Getting Married For The Second Time know the reason

फेब्रुवारी 2023 मध्येच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याच्या लेकिसोबत शाहीनचा निकाह पार पडला होता. त्यामुळं आता हा सात महिन्यांतच पुन्हा लग्न करतोय? असाच प्रश्न अनेकांना पडला.   

3/7

ती आहे तरी कोण?

Why Is Shaheen Shah Afridi Getting Married For The Second Time know the reason

आशिया चषक स्पर्धेनंतरच दोन दिवसांनी त्याचा हा निकाह पडणार आहे. पण, त्याची पत्नी दुसरीतिसरी कोणी नसून अनशाच आहे. ही तिच अनशा जिच्यासोबत शाहीननं फेब्रुवारीमध्ये निकाह केला होता.   

4/7

तो पुन्हा लग्न का करतोय?

Why Is Shaheen Shah Afridi Getting Married For The Second Time know the reason

राहिला प्रश्न ते पुन्हा लग्न का करतायत याबाबतचा तर, त्याचं उत्तरही इथंच आहे. फेब्रुवारी महिन्यात शाहीन आणि अनशा यांचा आफ्रिदी कुळाच्या रितीरिवाजांनुसार निकाह पार पडला होता.   

5/7

कुटुंबीयांची हजेरी

Why Is Shaheen Shah Afridi Getting Married For The Second Time know the reason

फेब्रुवारीतील त्यांच्या विवाहसोहळ्याला फक्त कुटुंबीयांचीच हजेरी होती. ज्यामध्ये पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील शाहीनचे काही मित्रही पाहायला मिळाले होते.   

6/7

पुन्हा एकदा निकाह

Why Is Shaheen Shah Afridi Getting Married For The Second Time know the reason

आता मात्र ही जोडी पुन्हा एकदा निकाह करत असून, यावेळी त्यांच्या आनंदात संपूर्ण मित्रपरिवार आणि कुटुंबीय सहभागी असणार आहेत. थोडक्यात त्यांचा दुसऱ्यांचा पार पडणारा निकाह अधिक मोठ्या आणि दिमाखदार स्वरुपात असेल.   

7/7

दिमाखदार सोहळ्याचं आयोजन

Why Is Shaheen Shah Afridi Getting Married For The Second Time know the reason

19 सप्टेंबरला हा सोहळा पाकिस्तानातील कराची येथे पार पडणार आहे. ज्यामध्ये 21 सप्टेंबर रोजी इस्लामाबाद येथे लग्नाच्या निमित्तानं रिसेप्शनचंही आयोजन करण्यात आलं आहे.