सगळं काही आरपार दिसणार; Lenovo कंपनीने सादर केला जगातील पहिला ट्रान्सपरंट लॅपटॉप

MWC 2024 या इव्हेंटमध्ये सादर करण्यात आलेला Lenovo Transparent Laptop सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. 

Feb 26, 2024, 22:05 PM IST

Lenovo Transparent Laptop : Lenovo कंपनीने   जगातील पहिला ट्रान्सपरंट लॅपटॉप  (Transparent Display Laptop) लाँच केला आहे. या लँपटॉपच्या डिस्प्लेमधून सगंळकाही आरपार दिसते. सध्या लॅपटॉपची जोरदार चर्चा आहे. 

1/7

 MWC 2024 इव्हेंटमध्ये Lenovo कंपनीच्या Transparent लॅपटॉपची झलक पहायला मिळाली. 

2/7

MWC 2024 टेक शो मध्ये Lenovo कंपनीने Transparent Laptop चा डमी सादर केला. मात्र. सध्या ही फक्त एक कॉन्सेप्ट असून हा लॅपटॉप सध्या विक्रीसाठी उपलब्ध नाही. 

3/7

यात 720 पिक्सल रेजोल्यूशन असलेला  माइक्रो LED स्क्रीन आहे. Windows 11 OS  सह AI कॅमेरा देखील आहे. 

4/7

या लॅपटॉपमध्ये 17.3 इंचाचा बेझल  डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 55 टक्के ट्रान्सपरंट असल्याचा दावा कंपनीने केला आहे.  

5/7

या किबोर्डमध्ये एकही बटन नसेल मोबाईल प्रमाणे याच्या किबोर्डचा सर्फेस असेल. 

6/7

Lenovo कंपनीच्या या लॅपटॉपच्या फक्त डिस्प्लेच नाही तर कि बोर्ड देखील ट्रान्सपरंट आहे. 

7/7

Lenovo कंपनीच्या Transparent लॅपटॉपमध्ये असलेल्या  Artificial Intelligence Generated Content (AIGC) या टेक्नोलॉजीच्या मदतीने यूजर्सना याचा वापर करताना नेक्स्ट लेवल अनुभव मिळेल.