Change of City Name : भारतातील 'या' टॉप 10 शहरांची नावं का बदलली तुम्हाला महिती आहे का?

Cities That Changed Their Names : महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांचं नाव बदलण्यात आलं. त्यानंतर एकच चर्चा रंगली या शहराची नावं बदलून सर्वसामान्यांना काय फरक पडणार? असो आज आपण भारतातील टॉप 10 शहरांची नावं का बदलली याबद्दल जाणून घेऊयात.

| Apr 03, 2023, 15:16 PM IST

Cities That Changed Their Names in marathi : औरंगाबादचं नाव संभाजीनगर (Aurangabad to Sambhajinagar) आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव (Osmanabad to Dharashiv) झालं. कधी काळी बॉम्बे असणारं हे शहर आज मुंबई (Mumbai News) म्हणून ओळखलं जातं. नरेंद्र मोदी सरकारने गेल्या 9 वर्षांमध्ये अनेक शहरांची नावं बदलली. विशेष म्हणजे एकट्या उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगीदित्यनाथ यांनी 20 शहरांची नावं बदलली. आज आपण भारतातील टॉप 10 शहरांची पूर्वीची नावं काय होती. त्याशिवाय त्यांचं नाव बदलण्यामागे कारणं हे जाणून घेणार आहोत.  (Why did the city change its name and what were the reasons 10 indian cities that changed their names in marathi)

1/10

अलाहाबाद ते प्रयागराज (उत्तर प्रदेश) (Allahabad to Prayagraj)

उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने अलाहाबाद हे नाव बदलून आता प्रयागराज केलं. मुघल सम्राट अकबराने या शहराचं नाव इलाहाबाद ठेवलं होतं. त्यांचा नातवाने त्याचं नाव नंतर अलाहाबाद केलं. त्यामुळे आज त्यांचं नाव बदलण्यात आलं. 

2/10

गुडगाव ते गुरुग्राम (हरयाणा) (Gurgaon to Gurugram)

मनोहर लाल खट्टर सरकारने गुडगावचं नाव बदलून गुरुग्राम असं करण्यात आलं. महाभारतात गुरुग्रामचे वर्णन गुरू द्रोणाचार्यांचं गाव, कौरव आणि पांडवांचं गुरु म्हणून केलं जातं. म्हणूनच आज ते गुरुग्राम म्हणून ओळखलं जाऊ लागलं.   

3/10

बॉम्बे ते मुंबई (महाराष्ट्र) (Bombay to Mumbai)

आपली मुंबई ही पूर्वी बॉम्बे होती. मुंबादेवीच्या नावावर या शहराचं नाव मुंबई करण्यात आलं. 17 व्या शतकात इंग्रजांनी शहराचा ताबा मिळवल्यानंतर पोर्तुगीजांचं नवा बॉम्बे असं ठेवलं होतं.

4/10

कलकत्ता ते कोलकाता (बंगाल) (Calcutta to Kolkata)

राज्याच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूंचा विचार करुन कलकत्ता आज कोलकाता झाला. हे शहर भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. सिटी ऑफ जॉय असं टोपणनावने देखील ओळखलं जातं. 

5/10

म्हैसूर - म्हैसुरू (कर्नाटक) (Mysore to Mysuru)

सुमारे सहा शतकं म्हैसूर नावाने ओळखलं जाणारा हा शहर म्हैसुरु म्हणून नावारुपाला आले. कन्नड भाषेत महिषाचे निवासस्थान आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, म्हैसूर हे ठिकाण आहे. जिथे देवी चामुंडेश्वरीने त्याचा वध करण्यापूर्वी राक्षस राजाने राज्य केलं होतं. 

6/10

मंगलोर ते मंगळुरू (कर्नाटक) (Mangalore to Mangaluru)

मंगलादेवी मंदिराची प्रमुख देवता मंगलादेवी यांच्या नावावरुन या शहराचं नाव देण्यात आले. हे शहर कन्नडमध्ये मंगळुरु म्हणून ओळखलं जाऊ लागलं. मंगळुरुच्या विविध समुदायांनी त्यांच्या भाषांमध्ये या शहराला वेगवेगळी नावं दिली होती.   

7/10

बंगलोर ते बंगळुरू (कर्नाटक) (Bangalore to Bengaluru)

भारताची आयटी राजधानी आजचं बंगळुरु काही वर्षांपूर्वी बंगलोर नावाने ओळखलं जायचं. 2006 मध्ये त्यांचं नाव बंगळुरु झालं. बेंगळुरु कन्नड भाषेतील नाव आहे. नवव्या शतकातील पश्चिम गंगा राजवंशाच्या शिलालेखात बेंगळुरुचा असा उल्लेख आहे. 

8/10

मद्रास ते चेन्नई (कर्नाटक) (Madras to Chennai)

मद्रास हे नाव 1996 मध्ये चेन्नई असं नाव झालं. हे ब्रिटीशकालीन नाव असल्याने बदलण्यात आलं. ब्रिटीश लष्करी नकाशाकारांचा असा विश्वास होता की मद्रास हा मूळचा मुंडिर राज किंवा मुंडीराज होता. म्हणून त्यांनी हे नावं ठेवले होते. 

9/10

पाँडेचेरी ते पुद्दुचेरी (तामिळनाडू) (Pondicherry to Puducherry)

केंद्राने 2006 मध्ये पाँडेचेरीचं नामातंरण केलं. आता त्याला पुडुचेरी या नावाने ओळखलं जातं. तमिळमध्ये पुडुचेरी याचा अर्थ नवीन शहर असा होतो. 

10/10

ओरिसा ते ओडिशा (बंगाल) (Oriss to Odisha)

ब्रिटीशकालीन नाव मोदी सरकारने बदलली. ओडिशा हा मूळ आणि प्राचीन नाव आहे. ग्रंथामध्ये पण ओरिसा नाही ओडिशा असा उल्लेख करण्यात आला आहे. पुरीमधील मंदिरांच्या भिंतींवर गजपती राज्याच्या कपिलेंद्र देवाचे शिलालेख या प्रदेशाला ओडिशा असं म्हटलं गेलं आहे.