insurance claim Rejection: का रिजेक्ट होतात इन्शुरन्स क्लेम? नितीन कामथ यांनी सांगितली 6 कारणं

Insurence Claim Rejection Reason: विमा पॉलिसी समजून घेणे कधीकधी कठीण काम असते. विशेषतः जेव्हा दावा नाकारला जातो, तेव्हा याचे महत्व कळते. 

| Dec 13, 2024, 13:01 PM IST
1/8

का रिजेक्ट होतात इन्शुरन्स क्लेम? नितीन कामथ यांनी सांगितली 6 कारणं

Why insurance claims are rejected nithin Kamath gives 6 Reasons

insurance claims: विमा पॉलिसी समजून घेणे कधीकधी कठीण काम असते. विशेषतः जेव्हा दावा नाकारला जातो, तेव्हा याचे महत्व कळते. झिरोधाचे सीईओ नितीन कामत यांनी नुकतेच दावा नाकारण्याच्या कारणांबद्दल सांगितले आहे.

2/8

पूर्णपणे माहिती नसते

Why insurance claims are rejected nithin Kamath gives 6 Reasons

अनेक लोकांना त्यांच्या विमा पॉलिसीच्या अटी, शर्ती आणि एक्सक्लूजनबद्दल पूर्णपणे माहिती नसते. त्यामुळे दावे नाकारले जातात. इन्शुरन्सचे दावे का नाकारले जातात? याबद्दल नितीन कामत यांनी सांगितलेली 6 कारणे जाणून घेऊया.

3/8

प्रतीक्षा कालावधी

Why insurance claims are rejected nithin Kamath gives 6 Reasons

विमा कंपन्या काही आजार आणि आधीपासून अस्तित्वात असलेल्या रोगांसाठी प्रतीक्षा कालावधी सेट करतात. पॉलिसी खरेदी करताना तुमच्या सल्लागाराकडून याबद्दल संपूर्ण माहिती मिळवा.

4/8

कव्हरेज नसणे

Why insurance claims are rejected nithin Kamath gives 6 Reasons

काही उपचार कव्हरेजमधून कायमचे वगळले जातात (जसे की ड्रग व्यसन). हे पूर्णपणे समजून घेण्यासाठी नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा किंवा तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या.

5/8

फसवे दावे

Why insurance claims are rejected nithin Kamath gives 6 Reasons

पॉलिसी घेताना तुम्ही तुमच्या आरोग्याशी संबंधित किंवा कोणत्याही आजाराशी संबंधित माहिती लपवली असल्यास तुमचा दावाही नाकारला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत जेव्हाही तुम्ही पॉलिसी घ्याल तेव्हा संपूर्ण कहाणी विमा कंपनीला सांगा आणि काहीही लपवू नका.

6/8

ब्लॅक लिस्टमध्ये रुग्णालय

Why insurance claims are rejected nithin Kamath gives 6 Reasons

जर विमा कंपनीच्या कव्हरेजच्या बाहेर असलेल्या रुग्णालयात उपचार केले गेले किंवा कंपनीने काळ्या यादीत टाकले असेल, तर दावा नाकारला जाऊ शकतो. विमा कंपनींनी ब्लॅक लिस्ट केलेल्या रुग्णालयांची यादी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

7/8

अनावश्यक हॉस्पिटलायझेशन

Why insurance claims are rejected nithin Kamath gives 6 Reasons

जर हॉस्पिटलायझेशन आवश्यक नसेल आणि तरीही तुम्ही दाखल झालात, तर दावा नाकारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, साध्या तापासाठी रुग्णालयात दाखल करणे आवश्यक नाही. तुम्ही तसे केल्यास तुमचा दावा नाकारला जाऊ शकतो.

8/8

विमा कंपनी विलंब

Why insurance claims are rejected nithin Kamath gives 6 Reasons

काहीवेळा विमा कंपनी कॅशलेस मंजुरीसाठी विलंब करू शकते. ज्यामुळे दावा नाकारला जातो.  अशा परिस्थितीत तुम्ही तक्रार करू शकता. ज्याने तुमचा क्लेम मिळवू शकता.