मायरा वायकुळच्या भावाचं नाव ठरलं; बारशाचा हा सोहळा अन् नावही तितकंच खास

बालकलाकार मायरा वायकुळ ताई झाली तेव्हा तिच्या कुटुंबाने हा आनंदाचा क्षण चाहत्यांसोबत शेअर केला. यानंतर बाळाच्या नावाची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. अखेर वायकुळ कुटुंबाने बाळाचं बारस अतिशय पारंपरिक पद्धतीने साजर केलं आहे. 

अनेक दिवसांपासून चाहते मायराच्या भावाच्या नावाबद्दल उत्सुक होते. सोशल मीडियावर त्याचे फोटो पोस्ट केले जात होते. अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. 

1/8

अगदी राजेशाही थाट आणि मराठमोळा अंदाज... अशा खास पद्धतीत मायराच्या भावाचा नामकरण सोहळा साजरा झाला. 

2/8

मायराच्या इंस्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये मायराच्या आईने नववारी साडी, मायराने परकर पोलकं आणि बाबांनी महाराजांच्या काळातील पोशाख कॅरी केलाय. 

3/8

मायराच्या भावादेखील अतिशय गोंडस असा पोशाख दिला होता. यामध्ये पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला आहे ज्याला हिरवी काढ दिली आहे. 

4/8

मायराच्या भावाचं नावं 'व्योम' असं ठेवलं आहे. यावेळी त्यांनी पोस्ट केलं आहे की,  आमच्या बाळाच नाव काय ? उंच अमर्याद *आकाशा* तील सूर्याचे *तेज* मी, *वाऱ्या* च्या सळसळ तृप्तीचा स्पर्श मी, नितळ निर्मळ *जल- जीवन* मी, अनंत -अथांग असे *अवकाश* मी, पंचमहाभूतांनी परिपूर्ण असा मी .... कोण? अहं .... *' व्योम '* !

5/8

'व्योम' या नावाचा अर्थ आकाश; भगवान गणेश यांचे आणखी एक नाव असा आहे. 

6/8

राजगड आणि राजगडावरचा थीम या नामकरण सोहळ्याला दिली होती. 

7/8

मायरा वायकुळ कायमच तिच्या पोस्टमध्ये अनेक गोष्टी शेअर करत असते. अगदी तसाच आता तिचा भाऊ व्योम देखील चर्चेत असतो. 

8/8

मायराने भावाचं नाव जाहीर करताच शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.