Weekly Numerology : या आठवड्यात कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या साप्ताहिक अंक राशिभविष्य

Weekly Numerology :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मुलांक हा 2+4 = 6. 6 हा तुमचा मूलांक असणार आहे. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी हा आठवडा कसा जाणून घेऊयात. 

Jan 28, 2024, 17:15 PM IST
1/9

मूलांक 1

या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात मोठे यश प्राप्त होणार आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबात काही समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे. लव्ह लाईफमधील समस्या तुमच्या जोडीदाराशी बोलून सोडवल्यास प्रश्न मिटतील. 

2/9

मूलांक 2

या आठवड्यात तुम्हाला काही कामाच्या ठिकाणी आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. या आठवड्यात खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा अडचणीत याल. लव्ह लाईफमध्ये गैरसमज होण्याची भीती आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही कुठेतरी फिरायला जाणार आहात.

3/9

मूलांक 3

या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामात खूप व्यस्त असणार आहात. तुम्हाला त्याचे चांगले परिणाम लाभणार आहेत. या आठवड्यात आई-वडील यांच्या तब्येतीची चिंता तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. परीक्षेत चांगली कामगिरी करणार आहात.

4/9

मूलांक 4

या आठवड्यात तुम्हाला काही समस्या किंवा तणावाचा सामना करावा लागणार आहे. या आठवड्यात तुम्ही लांबचा प्रवास टाळावा. नवीन प्रकल्प तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. लव्ह लाईफमध्ये रोमान्स असणार आहे.

5/9

मूलांक 5

या आठवड्यात कामात सुधारणा होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अशा परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे, ज्यामधून तुम्हाला ना नफा मिळेल ना तोटा. नवीन नोकरीची संधी चालून येणार आहे. मित्रांसोबत आनंदात वेळ व्यतित करणार आहात. घरी पाहुण्यांचे आगमन होणार आहे.

6/9

मूलांक 6

हा आठवडा तुमच्यासाठी शुभ असणार आहे. आधी केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कामात अधिक लक्ष द्या. लव्ह लाईफमध्ये तुमचा परस्पर समन्वय खूप चांगला राहणार आहे. तुमच्यासाठी लग्नाचा प्रस्ताव येणार आहे.

7/9

मूलांक 7

या आठवड्यात कामाच्या ठिकाणी काही मोठी सुधारणा होणार आहे. या आठवड्यात कौटुंबिक समस्यांमुळे तुमच्या आणि तुमच्या प्रेम जीवनात अंतर वाढणार आहे. आठवड्याच्या शेवटी कुटुंबातील एखादा सदस्य तुम्हाला दुखवून जाणार आहे.

8/9

मूलांक 8

या आठवड्यात घरात अनेक मार्गांनी धनाचे आगमन होणार आहे. एखाद्या कंपनीकडून चांगली नोकरीची ऑफर मिळणार आहे. तुम्हाला काही सरकारी योजनांचा फायदा होणार आहे. 

9/9

मूलांक 9

या आठवड्यात सर्व अपूर्ण कामं मार्गी लागणार आहे. तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला तुमच्या सर्व कामात यश मिळणार आहे. कुटुंबात एखादी शुभ घटना घडणार आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)