Christmas Party : ख्रिसमसला 'या' ठिकाणी होते विवस्त्र पार्टी; बुकिंगसाठी हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी

Christmas Party : सर्वत्र ख्रिसमस आणि न्यू इयरची तयारी सुरु आहे. अनेक हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे शक्कल लढवली जात आहे. पण जगाच्या पाठीवर एका देशात ख्रिसमसची पार्टी होते, जिथे कोणाच्या अंगावर एकही कपडा नसतो. 

नेहा चौधरी | Dec 24, 2024, 21:12 PM IST
1/7

ब्रिटनमधील वेस्ट मिडलँड्समधील बर्मिंगहॅम इथलं क्लोव्हर स्पा आणि हॉटेल यंदाच्या ख्रिसमसदरम्यान एक अनोखी ऑफर ग्राहकांना देत आहे. या हॉटेलमध्ये आयोजित ख्रिसमस इव्हेंटमध्ये ग्राहकांना कपडे घालणे ऐच्छिक असल्याच सांगितलंय. याचा अर्थ ग्राहक एकही कपडे न घालता या पार्टीसाठी येऊ शकता. हा एक अनोखा आणि साहसी अनुभव असून नग्नवादाला प्रोत्साहन देणारा आहे. पण निसर्गवादी समुदायामध्ये त्याला प्रचंड लोकप्रियता मिळालीय.     

2/7

क्लोव्हर स्पा आणि हॉटेलचे मालक टिम हिग्स यांना या योजनेबद्दल आनंद व्यक्त केलाय. त्यांचा असा विश्वास आहे की, नग्नता ही तणाव आणि चिंता कमी करण्याचे उत्तम साधन आहे. त्यासोबत ग्राहकांना पाऊस, वारा आणि सूर्यप्रकाशाचा अनुभव घेण्याची एक खास अनुमती मिळते. ज्यामुळे मानसिक शांतता ग्राहकांना मिळते.   

3/7

टिम म्हणतो, 'हे एक अतिशय मैत्रीपूर्ण, निर्णायक वातावरण असणारी पार्टी आहे. जेथे लोक कोणत्याही लैंगिक संदर्भाशिवाय कपडे नसल्याचा आनंद घेऊ शकतात.' ख्रिसमस पार्टीच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे हे हॉटेल आता निसर्गप्रेमी समुदायाचे मोठे आकर्षण केंद्रबिंदू ठरलंय. लोक येथे समाजकारणासाठी मोठ्या प्रमाणात येतात. 

4/7

याशिवाय हॉटेलमध्ये 40 वर्षांखालील लोकांसाठी खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांदरम्यान पाहुण्यांसाठी स्पा, नृत्य, संगीत आणि भोजन यासारख्या हॉटेल सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. डिसेंबर महिन्यात हॉटेलमध्ये चार मोठे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. 31 डिसेंबरला नवीन वर्षाची भव्य पार्टी आयोजित करण्यात आलीय. या कार्यक्रमांमध्ये सर्व वयोगटातील लोक सहभागी होणार आहेत. ही पार्टी दिवसभर चालणार असून यात खाणे, पेये, संगीत, खेळ आणि मजा ग्राहकांना करता येणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे लोक एकही कपडे न घालता ख्रिसमसचा आनंद घेऊ शकता. 

5/7

आंतरराष्ट्रीय पोलिंग फर्म इप्सॉसच्या मते, नग्नवादाची लोकप्रियता सतत वाढत असून आता 14% लोक स्वतःला निसर्गवादी किंवा न्युडिस्ट म्हणून ओळखतात. जे सुमारे 6.75 दशलक्ष लोक आहेत. ही वाढती लोकप्रियता पाहून हॉटेल टिम आणि त्यांच्या टीमला आशा आहे की, पुढच्या वर्षीही या कार्यक्रमांमध्ये आणखी लोक सहभागी होतील. टिमचा असा विश्वास आहे, की नग्नतेचा मानसिक आणि भावनिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो, विशेषतः आजच्या तणावपूर्ण करण्यास फायदेशीर ठरतो. 

6/7

हॉटेलचे मालक टिम हिग्स म्हणतात की कपड्यांशिवाय राहिल्याने तणाव आणि चिंता कमी होते. त्यांचा असा विश्वास आहे की, हा अद्भूत अनुभवातून ग्राहक खऱ्या अर्थाने निसर्गाला पूर्णपणे अनुभवू शकतात. इप्सॉसच्या अहवालानुसार निसर्गवादाची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. एका सर्वेक्षणानुसार, सुमारे 14% लोक स्वतःला निसर्गवादी मानतात, जे सुमारे 6.75 दशलक्ष लोकांच्या न्युडिस्ट आहे.

7/7

न्यू इयर पार्टीबाबत टिमने सांगितले की, आमच्या 'न्यूड इयर इव्ह' कार्यक्रमात दूरदूरचे निसर्गप्रेमी हजेरी लावतात. जुन्या वर्षाचा निरोप घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग असल्याचे तो मानतो.