उंची वाढवण्यासाठी करा ही योगासने

योगामुळे तुमची उंची काही  इंचांनी वाढू शकते कारण योगा केल्यानं  तुमचा पाठीचा मणका ताणला जातो आणि तुमची बसण्याची मुद्रा सुधारते. तसंच, जर तुम्ही नियमितपणे योगाभ्यास करत असाल तर त्यामुळं तणावाची पातळी कमी होऊन तुमची उंची नैसर्गिकरित्या वाढण्यास मदत होते.  

Jan 28, 2024, 15:54 PM IST

उंची ही अनुवंशिकता आणि तुमच्या आहारातील पोषक तत्वांवर अवलंबून असते, असं म्हटलं जातं की किशोरवयीन वयानंतर उंचीची वाढ खुंटली जाते.पण तरीही तुमची उंची किशोरवयीन वर्षांनंतर काही इंच वाढू शकते. यासाठी तुम्हाला 'या' काही खास योगासनांचा सराव करणं गरजेचं आहे. 

1/7

उंची वाढण्यासाठी दररोज ही योगासन कराल तर नक्कीच तुम्हाला फरक दिसून येईल. 

2/7

भुजंगासन

भुजंगासनाचा मुख्य परिणाम हा पोटाच्या आणि पाठीच्या स्नायुंवर होतो. यामुळे पोटाचे स्नायू सक्रीय होतात तर पाठीचे स्नायू मजबूत होतात. या आसनामुळे रक्तप्रवाह सुधारतो . उंची वाढवण्यासाठी या आसनाला महत्व आहे.  

3/7

वृक्षासन

उंची वाढवण्यासाठी वृक्षासन महत्वाचं आहे. या आसनामुळे पाय, पाठ आणि हात ताणून ते तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवतं. 

4/7

ताडासन

या आसनाचा सराव तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. पण  खाल्ल्यानंतर हे आसन करणं टाळावं. सकाळी उठल्यानंतर ताडासन केल्यास ते शरीरासाठी जास्त लाभदायक ठरतं.

5/7

मार्जरी मुद्रा

मार्जरी मुद्रा म्हणजे मांजरीसारखं शरीर ताणायचं. असं केल्यानं शरिराचे स्नायू लवचिक होतात.   टीप : पाठीच्या किंवा गुडघेदुखीने त्रस्त असलेल्यांना, गरोदर असल्यास, मानेला दुखापत किंवा दुखणं असल्यास, डोक्याला दुखापत झाल्यास याचा सराव करणं टाळावं.   

6/7

पश्चिमोत्तनासन

हे आसन तु्म्हाला पोटऱ्या पासून ते माने पर्यंतचे सर्व अवयव बळकट बनवतं. या आसनाच्या सरावामुळे स्त्रियांमधील मासिक पाळी संबंधीच्या तक्रारी दूर होतात. 

7/7

जेव्हा तुम्ही योगासनं करतात तेव्हा तुमचं शरिर उत्तम आणि तंदुरुस्त राहतं यामुळे आहारात वाढ आणि  शारीरिक हालचाल होउन उंची वाढते. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)