Pooja Dadlani : आर्यनला सोडवण्यासाठी जीवतोड प्रयत्न करणाऱ्या पूजा ददलानीचा पगार माहितीये?

Shahrukh khan manager Pooja Dadlani : क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर एनसीबीचे माजी विभागीय प्रमुख समीर वानखेडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सीबीआयने समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांनी 25 कोटींची लाच मागितली, असा आरोप सीबीआयने केला आहे. या सर्व प्रकरणादरम्यान, पूजा ददलानी हे नाव फार चर्चेत आले होते. शाहरुख खानची मॅनेजर अशीच तिची सुरुवातीची ओळख होती. मात्र आर्यन खान प्रकरणानंतर ती फारच चर्चेत आली होती.

May 18, 2023, 18:58 PM IST
1/8

pooja dadlani aryan khan

समीर वानखेंडेमुळे आर्यन खान अटक प्रकरण पुन्हा वर आल्याने पूजा ददलानीच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. आर्यन ड्रग्सच्या प्रकरणात अडकला तेव्हा पूजा ददलानीने त्याला सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे म्हटले जात होते.

2/8

Pooja Dadlani is Shahrukh Khan manager since 2012

2012 पासून पूजा ददलानी शाहरुख खानची मॅनेजर आहे. पूजा ददलानीचा जन्म 2 नोव्हेंबर 1983 रोजी मुंबईत झाला. बॉलिवूड लाईफनुसार, तिच्या आईचे नाव मीनू ददलानी आणि वडिलांचे मनू ददलानी आहे. त्यांना गीता नावाची बहीण आहे. तिचे शालेय शिक्षण मुंबईतील बाई आवाबाई फ्रामजी पेटिट गर्ल्स हायस्कूल आणि पुढील शिक्षण कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून झाले आहे. 

3/8

pooja dadlani family

पूजा ददलानीने मास कम्युनिकेशनची पदवीही घेतली आहे. पूजाने 2008 मध्ये हितेश गुरनानीसोबत लग्न केले. हितेश हे व्यावसायिक आहेत. लिस्टा ज्युल्स नावाच्या कंपनीचे ते संचालक आहे. त्यांना रेना नावाची मुलगीही आहे.

4/8

Shah Rukh Khan IPL team also manages Pooja dadlani

शाहरुखच्या चित्रपटांपासून ते रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन कंपनीपर्यंत पूजा ददलानी काम पाहते. शाहरुख खानची आयपीएलची टीमसुद्धा पूजा सांभाळते. पूजा शाहरुखची वैयक्तिक व्यवस्थापसोबत त्याची इतर कामेही पाहते. 

5/8

pooja dadlani salary

वृत्तानुसार, पूजा शाहरुखची बिझनेस मॅनेजर म्हणून दरवर्षी 7-9 कोटी रुपये कमावते. 2021 मध्ये मेन्सएक्सपीच्या अहवालात तिची एकूण संपत्ती सुमारे 45-50 कोटी रुपये होती. मात्र गेल्या दोन वर्षात त्यात वाढ झाली असणार आहे.

6/8

aryan khan drugs case

ऑक्टोबर 2021 मध्ये आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र 2022 मध्ये एनसीबीच्या आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज नसल्याचे समोर आले होते. या सर्व प्रकरणादरम्यान, पूजा आर्यनला भेटण्यासाठी एनसीबी कार्यालयात आणि न्यायालयात जात होती.  

7/8

shah rukh khan gauri khan

कोर्टातही शाहरुख आणि गौरी कमी उपस्थित असायचे. आर्यनच्या सुनावणीवेळी बऱ्याच वेळा पूजा ददलानी कोर्टात यायची. आर्यनला जामीन न मिळाल्याने पूजा अनेकदा भावूक झाली होती.

8/8

aryan khan pooja dadlani

आर्यन खानच्या सुटकेसाठी झालेल्या डीलमुळे पूजा ददलानी सर्वाधिक चर्चेत आली होती. या प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी याने पूजा ददलानीसोबत 18 कोटींची डील करुन पन्नास लाख रुपये घेतले होते. त्यानंतर किरण गोसावी हा एनसीबी अधिकारी नसल्याचे समजताच पूजा ददलानी सावध झाली होती. किरण गोसावीने पन्नास लाखांमधील 38 लाख रुपये पूजाला परत दिले आणि उर्वरित 12 लाख समीर वानखेडेंना दिल्याचे सांगिलते.