तुम्ही देखील 'हे' पदार्थ प्रेशर कुकरमध्ये शिजवता? जाणून घ्या याचे दुष्परिणाम

Pressure Cooker: स्वयंपाकघरातील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या भांड्यांपैकी एक म्हणजे प्रेशर कुकर. पटकन पदार्थ शिजवण्यासाठी प्रेशर कुकर हा एक उत्तम पर्याय आहे. प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवल्याने वेळेची बचत तर होतेच, त्यासोबतच गॅसची बचत होते. मात्र काही पदार्थ असे आहेत ज्यांना प्रेशर कुकरमध्ये शिजवल्याने त्याचे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. आताच जाणून घ्या कोणते अन्नपदार्थ कुकरमध्ये शिजवू नये.

Jan 16, 2025, 18:02 PM IST
1/6

दुग्धजन्य पदार्थ

दूध, दही आणि पनीर यांसारखे दुग्धजन्य पदार्थ प्रेशर कुकरमध्ये शिजवल्याने त्या पदार्थाला चांगली चव राहत नाही. त्यातील कित्येक पोषक तत्वसुद्धा नष्ट होऊन जातात. याशिवाय प्रेशर कुकरमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवणेदेखील चुकीचे आहे. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थ कुकरमध्ये शिजवणे टाळा.

2/6

तांदुळ

प्रेशर कुकरमध्ये सर्वात जास्त शिजवला जाणारा पदार्थ म्हणजे भात. आपल्यापैकी अनेक लोक भात नेहमी कुकरमध्येच शिजवतात. पण प्रेशर कुकरमध्ये तांदुळ शिजल्याने तांदळातील स्टार्चमध्ये घातक कॅमिकल्स असतात. हे कॅमिकल्स आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. तांदळाला कधीही न झाकता शिजवले पाहिजे.

3/6

डाळी

डाळींमध्ये मोठ्याप्रमाणात प्रोटीन आणि फायबर ही पोषक तत्वे असतात. डाळीतील ही पोषक तत्वे प्रेशर कुकरमध्ये शिजवल्याने पूर्णपणे नष्ट होऊ शकतात. डाळींना घट्ट न झाकता, मध्यम आचेवर शिजवण्याची पद्धत अगदी बरोबर आहे.  

4/6

मासे

प्रेशर कुकरमध्ये मासे शिजवल्याने त्यांचे मांस कडक होते आणि कोरडेही होते. याशिवाय कुकरमध्ये जास्त आचेवर शिजवल्याने माश्यांमधील ओमेगा-3 हा फॅटी एसिड नष्ट होतो.

5/6

पास्ता आणि नुडल्स

प्रेशर कुकरमध्ये जास्त तापमानावर शिजवलेले पास्ता आणि नुडल्स आवश्यकतेपेक्षा जास्त दबावामुळे सहज रित्या चिकट होते. त्यामुळे पास्ता आणि नुडल्सचा आकारही बिघडतो. पास्ता आणि नुडल्सवर देखील मोठ्याप्रमाणात स्टार्च असते. स्टार्चवरील कॅमिकल्स आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. पास्ता आणि नुडल्स शक्यतो पॅन किंवा कढईत शिजवले पाहिजे.

6/6

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)