PHOTO: जगातील सर्वात उंच भगवान शंकराची मूर्ती कोणत्या राज्यात आहे?

Tallest Statue of Lord Shiva: जगातील सर्वात उंच भगवान शंकराची मूर्ती कोणत्या राज्यात आहे? श्रावण महिना हा भोलेनाथाला समर्पित करण्यात आला आहे. श्रावणात भक्त शंकराच्या मंदिरात जातात. त्याशिवाय 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात. पण तुम्ही जगातील सर्वात उंच भगवान शंकरांची मूर्ती कुठे आहे माहितीय का?

नेहा चौधरी | Jul 22, 2024, 18:18 PM IST
1/7

महादेवाचे भक्त जगभरात पसरलेय असून श्रावणात भोलेनाथाची विशेष महत्त्व असतो. जगभरात महादेवाच्या अनेक उंचच मूर्ती आहेत. जगातील सर्वात उंच मूर्ती ही भारतातील राज्यामध्ये आहे. 

2/7

'विश्वास स्वरूपम' ही भगवान शंकरांची सर्वात उंच मूर्ती असून आतापर्यंत 15 लाखांहून अधिक पर्यटकांनी या जागेला भेट दिली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये या मूर्तीच अनावरण करण्यात आलं होतं. 

3/7

51 एकरात पसरलेली ही शिवाची सर्वात मोठी मूर्ती असून तिची उंची 369 फूट इतकी आहे. या मूर्तीला जगातील टॉप-5 उंच मूर्तींमध्ये स्थान मिळालंय. 

4/7

संत कृपा सनातन संस्थेने तयार केलेल्या या मूर्तीला बनवण्यासाठी 10 वर्षे लागली आहेत. ही मूर्ती एवढी मजबूत आहे की, तासी 250 कि.मी वारे सुटले तरी या मूर्तीला धक्कादेखील लागणार नाही. 

5/7

ही मूर्ती अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असून लिफ्ट, जिने आणि हॉलची सुविधा आहे. मूर्तीच्या टॉपला जाण्यासाठी चार लिफ्ट आणि तीन जिने असून पुतळ्याच्या बांधकामात 3000 टन स्टील, लोखंड, 2.5 लाख टन काँक्रीट आणि वाळू लागली आहे. 

6/7

या मूर्तीच्या आत एकावेळी 10 हजार पर्यटक जाऊ शकतात. ही मूर्ती पाहण्यासाठी 4 तासांचा वेळ लागतो. या परिसरात लहान मुलांसाठी गेमिंग झोन, म्युझिकल कारंजे, बंजी जंपिंग, खाद्यपदार्थांसाठी फूड कोर्ट, फोटो शौकिनांसाठी सेल्फी पॉइंट्स आहे. 

7/7

राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यात नाथद्वारामध्ये ही सर्वात उंच भगवान शंकराची मूर्ती आहे. इथे विमानाने जाण्यासाठी जवळच विमानतळ राजसमंद आहे तर नाथद्वारा हे जवळच रेल्वे स्टेशन आहे.