हार्दिक पांड्याचा गेम झालाय? संघातील सहकाऱ्यांनीच केला घात? अजित आगरकरांचा मोठा खुलासा

Ajit Agarkar On Hardik Pandya : हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवची (Suryakumar yadav) कॅप्टन म्हणून निवड का केली गेली? असा सवाल विचारला जात आहे. यावर उत्तर देताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी उत्तर दिलंय.

| Jul 22, 2024, 18:24 PM IST
1/5

हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्या हा खूप महत्त्वाचा खेळाडू आहे, पण फिटनेस हे आव्हान आहे आणि कोणीतरी सतत उपलब्ध असावं, अशी आमची इच्छा आहे, असंही आगरकर म्हणाले.

2/5

अजित आगरकर

मात्र, टी-ट्वेंटीचा कॅप्टन निश्चित करण्यासाठी खेळाडूंचं मत विचारात घेतलं होतं का? असा प्रश्न आगरकरांना विचारण्यात आला होता.

3/5

ड्रेसिंग रूमचा अभिप्राय

टी-20 संघाचा कर्णधार ठरवताना ड्रेसिंग रूमचा अभिप्राय देखील विचारात घेतला गेला होता, असं अजित आगरकर म्हणाले. 

4/5

अंतर्गत विरोध

त्यामुळे हार्दिक पांड्याला कॅप्टन करण्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंचा अंतर्गत विरोध होता का? असा सवाल विचारला जात आहे.

5/5

सूर्यकुमार यादव

दरम्यान, सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्यात आलं कारण तो पात्र उमेदवारांपैकी एक आहे. तो सर्वोत्तम टी-ट्वेंटी फलंदाजांपैकी एक आहे. तुम्हाला असा कर्णधार हवा आहे जो सर्व सामने खेळू शकेल, असंही आगरकर यांनी म्हटलं आहे.