कोणत्या देशातील शिक्षक सर्वोत्कृष्ठ! भारतीय शिक्षक कितव्या क्रमांकावर?

Best Teacher Rank in World: शिक्षक नवी पिढी घडवत असतो. अशावेळी एका सर्व्हेनुसार कोणत्या देशातील शिक्षक सर्वोत्कृष्ठ आहेत. पाहा भारतातील शिक्षकांचा क्रमांक यादीत कितव्या नंबरवर? 

1/7

कोणत्या देशातील शिक्षक सर्वोत्तम आहेत. त्या देशातील विद्यार्थी देखील तसेच गुणवान आणि हुशार असतात. त्या देशाचे भविष्य उज्वल असेल यात शंका नाही. जगभरात भारतीय शिक्षकांचा क्रमांक कोणत्या यादीत असेल याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. 

2/7

आकडेवारीतून याबाबत माहिती समोर आली आहे. नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस एजन्सी 'नासा' म्हणूनही ओळखली जाते. काही वर्षांपूर्वी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, नासाचे 36% कर्मचारी भारतीय होते. तर, अमेरिकेत काम करणारे 38% डॉक्टर हे भारतीय होते.

3/7

ही आकडेवारी म्हणजे भारतीयांचे शिक्षण जगात खूप उच्च दर्जाचे आहे याचा पुरावा आहे. पण या दरम्यान अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो. जगातील सर्वोत्तम शिक्षक कुठे आहेत? या यादीत भारतीय शिक्षक कोणत्या क्रमांकावर आहेत?  

4/7

जगातील शिक्षण आणि शिक्षण पद्धतीबद्दल बोलायचे झाल्यास, फिनलंड सर्वात वर येतो. फिनलंडमध्ये शिक्षक होणे हे भारतातील नागरी सेवा अधिकारी होण्यासारखे आहे. तिथल्या शिक्षणाचा दर्जा खूप वरचा आहे. तेथील शिक्षक भरती प्रक्रिया अत्यंत अवघड आहे.  

5/7

सिंगापूरची शिक्षण व्यवस्थाही जगातील सर्वोत्तम मानली जाते. सिंगापूर सरकार आपल्या देशातील शिक्षकांमध्ये आणि शिक्षण प्रणाली सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करते. सिंगापूरमध्ये शिक्षकांना आधुनिक सुविधा पुरविल्या जातात.

6/7

तंत्रज्ञानाच्या बाबतीत जपान हा जगातील सर्वात वेगाने विकसित होणारा देश आहे. जपानमधील शिक्षणाचा स्तरही खूप चांगला आहे. जपानमध्ये शिक्षक होण्यासाठी तुम्हाला कठीण परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. जपानमध्ये शिक्षकांसाठीही अनेक प्रगत कार्यक्रम घेतले जातात.

7/7

याशिवाय दक्षिण कोरिया आणि चीन हे देशही शिक्षणाच्या बाबतीत चांगले मानले जातात. भारताबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या काही वर्षांत भारतातील शिक्षकांची स्थिती चांगली होत आहे. पण तरीही भारतातील बहुतांश शिक्षक उच्च दर्जाचे नाहीत. मात्र, आता भारतातही शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.