कोणत्या देशात सर्वात प्रथम वाहनांवर नंबर प्लेट लावायला सुरुवात झाली? नक्की काय आहे याचं महत्व?

आजकाल वाहनांवर नंबर प्लेट असणं खूप साधारण गोष्ट आहे. नंबर प्लेट गाडीची ओळख असते, यावरून तुम्ही गाडी कोणाद्वारे खरेदी केली, गाडी कोणत्या प्रदेशातील आहे इत्यादींची माहिती मिळते. पण तुम्हाला माहित आहे का की कोणत्या देशात सर्वात प्रथम वाहनांवर नंबर प्लेट लावायला सुरुवात झाली?

| Oct 14, 2024, 16:20 PM IST
1/5

वाहनांच्या नंबर प्लेटचा इतिहास :

वाहनांवर नंबर प्लेट लावण्याची सुरुवात 19 व्या शतकाच्या शेवटापासून झाली. गाड्यांची वाढती संख्या, वाहतूक नियम पाळले जात आहेत की नाहीत यावर लक्ष ठेवणे तसेच वाहन अपघातांचे वाढते प्रमाण, इत्यादींमुळे वाहने ओळखण्यासाठी पद्धतशीर मार्ग काढणे गरजेचे झाले होते. 

2/5

पहिली नंबर प्लेट कोठे लावण्यात आली? :

सर्वात प्रथम गाड्यांवर नंबर प्लेट लावण्याची सुरुवात फ्रांसमधून झाली. त्यावेळी वाहनांच्या नंबर प्लेटवर गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर असायचा. त्यामुळे पोलीस गाडी नेमकी कोणाची आहे हे ओळखू शकत होते. 

3/5

इतर देश वाहनांवर नंबर प्लेट कधीपासून लावायला लागले? :

फ्रान्सनंतर यूरोपातील इतर देशांनी सुद्धा त्यांच्या देशातील वाहनांवर नंबरप्लेट लावण्यास सुरुवात केली. ब्रिटेनमध्ये 1903 साली आणि जर्मनीत 1906 साली वाहनांवर नंबर प्लेट लावण्यास सुरुवात झाली. अमेरिकेत सुद्धा 20 व्या शतकात अनेक राज्यांमध्ये वाहनांवर नंबर प्लेट लावण्याचा कायदा बनला.   

4/5

भारतात कधी झाली सुरुवात?

भारतात 1947 साली वाहनांवर नंबर प्लेट लावायला सुरुवात झाली. भारतात नंबर प्लेटवर वाहनांचे नोंदणी क्रमांक, राज्याचे कोड आणि वाहनाचा प्रकार लिहिलेला असतो. सध्या नंबर प्लेट हे फक्त वाहन ओळखण्याचे साधन राहिले नाही तर अनेक देशांमध्ये नंबर प्लेटवर वाहनाच्या मालकाविषयी विविध प्रकारची माहिती असते, जसे की वाहनाचे मॉडेल, इंजिन नंबर सुद्धा असतो.   

5/5

काय आहे नंबर प्लेटचं महत्व?

1. अपघाताच्या वेळी नंबर प्लेटवरून गाडी ओळखणे सोपे जाते. तसेच दोषींना सुद्धा शोधण्यास पोलिसांना मदत मिळते. 2. नंबरप्लेट द्वारे वाहन चालकांकडून कर आकारला जातो. 3. नंबर प्लेटच्या माध्यमातून पोलिसांना वाहतूक नियंत्रित करण्यास सोप जाते. 4. चोरी झाल्यास नंबर प्लेटवरून वाहन सहज ओळखता येते.