ऑफिसमध्ये रोमॅन्स करणार त्यांना कंपनी बक्षीस देणार; विचित्र पॉलिसीमुळे सगळेच चक्रावले

कर्मचाऱ्यांचं कामात चांगल लक्ष लागावं म्हणून कंपनी काही ना काही युक्त्या लढवत असतात. पण या कंपनीने दिलेली अजब ऑफर चांगलीच चर्चेत आली आहे. रोमान्स करणाऱ्या कर्मचाऱ्याला चक्क रोख रक्कम देणार असल्याच सांगितलं आहे. 

| Nov 25, 2024, 11:17 AM IST

कर्मचाऱ्यांचं कामात चांगल लक्ष लागावं म्हणून कंपनी काही ना काही युक्त्या लढवत असतात. पण या कंपनीने दिलेली अजब ऑफर चांगलीच चर्चेत आली आहे. रोमान्स करणाऱ्या कर्मचाऱ्याला चक्क रोख रक्कम देणार असल्याच सांगितलं आहे. 

1/8

ऑफिसमध्ये रोमॅन्स करणार त्यांना कंपनी बक्षीस देणार; विचित्र पॉलिसीमुळे सगळेच चक्रावले

2/8

प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे नियम असतात. पण या कंपनीने चक्क ऑफिसमध्येच रोमान्स करण्याची परवानगी दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कंपनीने डेट करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. 

3/8

एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये रोमान्स करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. हो, अगदी तुमची बरोबर वाचताय. या कंपनीने कर्मचाऱ्यांना डेट करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. थक्क करणाऱ्या या बातमीने सोशल मीडियावर एकच खळबळ उडवली आहे. 

4/8

एका चीनी कॅमेरा कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना डेट करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. एवढंच नव्हे तर असं करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनी नकद रोख रक्कम देखील देणार आहे.   

5/8

शेन्जेनच्या कंपनीने इंस्टा 360 ने आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की, ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्मवर केलेल्या प्रत्येक पोस्टकरिता ¥66 म्हणजे जवळपास 750 रुपये रोख रक्कम दिली जाणार आहे. 

6/8

जर कोणते कर्मचारी डेटिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमापासून कुणाचे सक्सेसफुली जुळेल. एवढंच नव्हे तर त्यांचे नाते कमीत कमी तीन महिन्यांपर्यंत टिकलं. तर कंपनी त्या कपलला आणि मॅचमेकरला दोघांना 1000-1000 येनचं बक्षिस देणार आहे. 

7/8

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने कंपनीच्या एका स्पोकपर्सनकडून ही माहिती दिली आहे. या गोष्टीमधून कंपनीला कर्मचाऱ्यांमध्ये आपलेपणाची भावना आणि आनंदाला प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. 

8/8

मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, जेव्हापासून कंपनीने याबाबत सांगितले आहे तेव्हापासून 500 पोस्ट शेअर करण्यात आले आहे. कर्मचारी आणि त्यांच्या मॅचमेकिंगमुळे जवळपास  ¥10,000 देण्यात आले आहेत. सोशल मीडिया युझर्स कंपनीची पॉलिसी पाहून अनेकांनी अक्षरशः डोक्याला हात लावले आहे.