तुम्हीपण 50 हजारांची इलेक्ट्रिक स्कूटर घेतलीय? बॅटरी बदलायला खर्च ऐकून बसेल धक्का!

ओलाने गेल्या महिन्यात फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची प्रचंड विक्री केली. कंपनीने सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर 50,000 रुपयांना विकली. सणासुदीच्या काळात कंपनीने Ola S1X ची किंमत 49,999 रुपये ठेवली होती.

| Nov 24, 2024, 21:51 PM IST

Electric Scooter: ओलाने गेल्या महिन्यात फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची प्रचंड विक्री केली. कंपनीने सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर 50,000 रुपयांना विकली. सणासुदीच्या काळात कंपनीने Ola S1X ची किंमत 49,999 रुपये ठेवली होती.

1/9

तुम्हीपण 50 हजारांची इलेक्ट्रिक स्कूटर घेतलीय? बॅटरी बदलायला खर्च ऐकून बसेल धक्का!

Electric OLA Scooter Battery replacement cost Auto Marathi News

Electric Scooter: ओलाने गेल्या महिन्यात फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची प्रचंड विक्री केली. कंपनीने सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर 50,000 रुपयांना विकली. सणासुदीच्या काळात कंपनीने Ola S1X ची किंमत 49,999 रुपये ठेवली होती.

2/9

किलोमीटरची वॉरंटीही दिली

Electric OLA Scooter Battery replacement cost Auto Marathi News

आता या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 69 हजार 999 रुपये (एक्स-शोरूम) आहे. कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर Ather, TVS आणि चेतक पेक्षा खूपच कमी किमतीत विकली. एवढेच नव्हे तर कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरवर 8 वर्षे किंवा 80,000 किलोमीटरची वॉरंटीही देत ​​आहे.

3/9

इलेक्ट्रिक स्कूटर स्वस्तात विकत घेतली

Electric OLA Scooter Battery replacement cost Auto Marathi News

ऑफरमध्ये अनेकांनी ही इलेक्ट्रिक स्कूटर स्वस्तात विकत घेतली. पण तुम्हाला या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी बदलण्याची किंमत देखील माहिती असायला हवी.

4/9

बॅटरी कव्हरेज नाही

Electric OLA Scooter Battery replacement cost Auto Marathi News

जरी ओला स्कूटरवर 8 वर्षे किंवा 80,000 किलोमीटरची वॉरंटी मिळत असली तरी अशा अनेक अटी आहेत ज्यात कंपनी स्कूटरवर कोणतीही वॉरंटी देत ​​नाही. जसे की, बॅटरीचे नुकसान, आग, पाण्यापासून होणारे नुकसान किंवा इतर कारणे.

5/9

बजेट बिघडू शकते

Electric OLA Scooter Battery replacement cost Auto Marathi News

पण जेव्हा तुम्हाला बॅटरी बदलण्याची किंमत ऐकाल तेव्हा तुम्हाला धक्का बसू शकतो. तुमचे बजेट बिघडू शकते. स्कूटरच्या सर्व मॉडेल्सच्या बॅटरीची किंमत जाणून घेऊया.

6/9

बॅटरीची किंमत किती?

Electric OLA Scooter Battery replacement cost Auto Marathi News

EVIndia च्या रिपोर्टनुसार, Ola S1 Pro च्या बॅटरीची किंमत 87,000 ते 90,000 रुपयांच्या दरम्यान आहे. तर S1 Air ची बॅटरी सुमारे 70,000 रुपयांना मिळते. S1 साठी बॅटरीची किंमत S1 X+ व्हेरिएंटच्या बॅटरीची किंमत देखील सुमारे 70,000 रुपये असल्याचे सांगितले जाते.

7/9

सोशल मीडिया यूजरची पोस्ट

Electric OLA Scooter Battery replacement cost Auto Marathi News

याआधी तरुण पाल या सोशल मीडिया यूजरने ओलाच्या बॅटरीच्या किमतींची माहिती शेअर केली होती. त्याने लाकडी पेट्यांमध्ये पॅक केलेल्या बॅटऱ्यांचे फोटो पोस्ट केले होते आणि त्यावर स्पष्टपणे किंमत लिहिलेली होती.

8/9

बॅटरीची किंमत 87 हजार 298 रुपये

Electric OLA Scooter Battery replacement cost Auto Marathi News

त्यांच्या माहितीनुसार, Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये वापरलेल्या 2.98 kWh बॅटरीची किंमत 66 हजार 549 रुपये होती, तर S1 Pro मध्ये वापरण्यात आलेल्या 3.97 kWh बॅटरीची किंमत 87 हजार 298 रुपये होती.

9/9

बॅटरी बदलण्याची किंमत खूप जास्त

Electric OLA Scooter Battery replacement cost Auto Marathi News

या किंमती पाहून हे स्पष्ट होते की इलेक्ट्रीक स्कूटरच्या बॅटरी बदलण्याची किंमत खूप जास्त असू शकते. त्यामुळे ओला स्कूटर खरेदी करण्यापूर्वी या आकडेवारीचा विचार करणे खूप महत्वाचे आहे.