मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स कोणत्या 6 खेळाडूंना रिटेन करणार? नावं आली समोर

इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजन पूर्वी मेगा ऑक्शन पार पडणार असून यासाठी आयपीएल गवर्निंग काउंसिलकडून आयपीएल 2025 साठी एकूण 8 नियमांची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक फ्रेंचायझी त्यांच्या टीममधील केवळ 6 खेळाडूंना रिटेन करू शकतात. तेव्हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी ठरलेल्या फ्रेंचायझींपैकी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार याविषयी चर्चा सुरु आहे. 

| Sep 29, 2024, 17:20 PM IST
1/7

बेंगळुरू येथे 28 नोव्हेंबर रोजी आयपीएल गवर्निंग काउंसिलच्या बैठकीनंतर रिटेनशन पॉलिसी जाहीर करण्यात आली. तेव्हा आता आयपीएलमधील 10 टीम कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार आणि कोणाला रिलीज करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.   

2/7

समोर येत असलेल्या माहितीनुसार फ्रेंचायझींकडे आयपीएल 2025 ऑक्शनपूर्वी खेळाडूंना रिटेन करण्यासाठी 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रत्येक फ्रेंचायझीला 31 ऑक्टोबर च्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करावी लागेल.   

3/7

आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी, सर्व संघ जास्तीत जास्त सहा खेळाडू रिटेन करू शकतात. जर संघानी सह खेळाडूंना रिटेन केले तर ते राईट टू मॅच म्हणजेच RTM कार्ड वापरू शकत नाहीत. याचा अर्थ, आयपीएल फ्रेंचायझी जितके कमी खेळाडू रिटेन करेल तितके जास्त राईट टू मॅच कार्ड्स त्यांच्याकडे असतील, जे ते ऑक्शनमध्ये वापरू शकतात.

4/7

आयपीएल गवर्निंग काउंसिलच्या बैठकीनंतर रिटेंशन पॉलिसी जाहीर करण्यात आल्या. तेव्हा आयपीएलच्या प्रत्येक फ्रेंचायझी कोणत्या खेळाडूंना रिटेन करू शकतात याची संभाव्य यादी किंवा अंदाजे यादी जिओ सिनेमाने जाहीर केली आहे.  

5/7

आयपीएल 2023 पासून जिओ सिनेमाकडे आयपीएलच्या डिजिटल लाईव्ह स्ट्रीमिंगचे राईट्स आहेत. जिओ सिनेमाने मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्स, आरसीबी इत्यादी सर्व संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करू शकतात याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

6/7

जिओ सिनेमानुसार मुंबई इंडियन्स रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, तिलक शर्मा किंवा ईशान किशन या खेळाडूंना रिटेन करू शकते. 

7/7

जिओ सिनेमाच्या अंदाजानुसार चेन्नई सुपरकिंग्स एम एस धोनी, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, पथीराना तसेच शिवम दुबे किंवा तुषार देशपांडे या खेळाडूंना रिटेन करू शकते.