धनश्री- चहलच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान आणखी एका खेळाडूचं नातं तुटणार? सोशल मीडियावर समोर आले सत्य

या क्रिकेटरने आपल्या पत्नीला अनफॉलो देखील केले आहे आणि आपल्या सोशल मीडिया हँडलवरून पत्नीचे सर्व फोटो हटवले आहेत.

| Jan 11, 2025, 10:35 AM IST

Cricketer Divorce: या क्रिकेटरने आपल्या पत्नीला अनफॉलो देखील केले आहे आणि आपल्या सोशल मीडिया हँडलवरून पत्नीचे सर्व फोटो हटवले आहेत.

 

1/7

२०२३ च्या वर्षी अखेरीस हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. तर आता गेल्या काही दिवसांपासून चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. 

2/7

युजवेंद्र चहलनंतर आणखी एक क्रिकेटर आहे ज्याच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर धरला आहे. होय, या क्रिकेटरने आपल्या पत्नीला अनफॉलो देखील केले आहे आणि आपल्या सोशल मीडिया हँडलवरून पत्नीचे सर्व फोटो हटवले आहेत.  

3/7

हा खेळाडू दुसरा कोणी नसून मनीष पांडे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या आणि पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे.  त्यामुळे दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे, एवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवरून पत्नीचे फोटोही डिलीट केले आहेत. दोघांच्या या कृतीमुळे त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत.

4/7

या बातम्यांना बळ मिळाले कारण अर्शिताने गेल्या वर्षी जूनपासून सोशल मीडियावर मनीषसोबतचा कोणताही फोटो पोस्ट केलेला नाही. तर मनीषने त्याच्या फीडवरून पत्नीचे फोटोही डिलीट केले आहेत. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकत्र दिसले नाहीत, त्यामुळे विभक्त होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

5/7

क्रिकेटर  मनीष पांडेची पत्नी अश्रिता शेट्टी एक अभिनेत्री आहे. आश्रिता तामिळ चित्रपट करते. दोघांनी 2019 मध्ये लग्न केले होते.

6/7

मनीष पांडे आणि अर्शिता शेट्टी यांनी अद्याप त्यांच्या नात्याच्या किंवा घटस्फोटाच्या बातम्यांवर कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले  नाही. त्यांच्या विभक्त होण्याचे कारण काय हे स्पष्ट झालेले नाही.  

7/7

मनीष सध्या आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून तो आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून आपल्या क्रिकेट कारकिर्दीला नवी दिशा देऊ शकेल.