भारतातील एकमेव ट्रेन, ज्यात खाणं-पिणं मिळत फ्री! 29 वर्षांपासून सुरु आहे परंपरा

  आज आम्ही तुम्हाला ज्या ट्रेनबद्दल सांगणार आहोत, त्या ट्रेनमध्ये जेवण अगदी मोफत दिले जाते.

| Sep 29, 2024, 16:02 PM IST

Free Food In Train:  आज आम्ही तुम्हाला ज्या ट्रेनबद्दल सांगणार आहोत, त्या ट्रेनमध्ये जेवण अगदी मोफत दिले जाते.

1/9

भारतातील एकमेव ट्रेन, ज्यात खाणं-पिणं सर्व फ्री.., 29 वर्षांपासून सुरु आहे परंपरा

Indian Railway Free Food In Train Sachkhand Express route Marathi News

Free Food In Train: खाण्यापिण्याची सोय असेल तर रेल्वे प्रवासाची मजा काही औरच असते. तुम्ही रेल्वेतून प्रवास करताय आणि तुम्हाला कोणी गरमागरम जेवण आणून दिलंय, ट्रेनमध्ये खाण्यापिण्यासाठी पॅन्ट्री कारची सुविधा आहे, याशिवाय रेल्वे स्थानकांवर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उपलब्ध आहे, अशाने ट्रेनचा प्रवास किती मजेशीर होईल ना?

2/9

काहीही खर्च न करता पोटभर

Indian Railway Free Food In Train Sachkhand Express route Marathi News

या सर्व सुविधांसाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात. पण आज आम्ही तुम्हाला ज्या ट्रेनबद्दल सांगणार आहोत, त्या ट्रेनमध्ये जेवण अगदी मोफत दिले जाते. संपूर्ण प्रवासादरम्यान एकदाच नव्हे तर 6 वेळा तुम्ही काहीही खर्च न करता पोटभर जेवू शकता.

3/9

या ट्रेनमध्ये मिळते मोफत जेवण

Indian Railway Free Food In Train Sachkhand Express route Marathi News

सचखंड एक्सप्रेस (12715) असे या स्पेशल ट्रेनचे नाव आहे. या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जेवणाची चिंता करण्याची गरज नसते. कारण रेल्वे प्रवासात त्यांना मोफत जेवण मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून या ट्रेनमध्ये प्रवाशांना खास लंगर दिला जातो.

4/9

6 स्थानकांवर प्रवाशांसाठी लंगर

Indian Railway Free Food In Train Sachkhand Express route Marathi News

सचखंड एक्स्प्रेस ही 39 स्थानकांवर थांबते. या दरम्यान 6 स्थानकांवर प्रवाशांसाठी लंगर आहे. लोकांना आरामात लंगरचे जेवण घेता यावे म्हणून ट्रेनही त्यानुसार त्या स्टेशनवर थांबते.

5/9

29 वर्षांची परंपरा

Indian Railway Free Food In Train Sachkhand Express route Marathi News

अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेसमध्ये 29 वर्षांपासून प्रवाशांना मोफत जेवण दिले जात आहे. या ट्रेनमधून प्रवास करताना सोबत अन्न घेऊन जाण्याची किंवा खरेदी करण्याची गरज नसते.  ज्यांनी या ट्रेनने प्रवास केला आहे त्यांना याबद्दल माहिती असेल.

6/9

लंगरने भूक भागते

Indian Railway Free Food In Train Sachkhand Express route Marathi News

प्रवासादरम्यान लोक त्यांच्यासोबत जेवणाचं भांड घेऊन जातात. 2081 किमीच्या प्रवासादरम्यान, प्रवाशांना 6 स्थानकांवर लंगर मिळतो. जिथे ते काहीही खर्च न करता मोफत जेवण घेऊ शकतात. ट्रेनमध्ये पॅन्ट्री देखील आहे. पण येथे अन्न शिजवले जात नाही. कारण लोकांची भूक लंगरने पूर्ण केली जाते.

7/9

प्रवासी त्यांच्यासोबत भांडी घेऊन जातात

Indian Railway Free Food In Train Sachkhand Express route Marathi News

ट्रेनच्या जनरल ते एसी कोचपर्यंत प्रवासी भांडं घेऊन जातात. स्थानकांवर फक्त भांडं पुढे केलं जातं आणि लंगर प्रसाद मिळतो.  सचखंड एक्सप्रेस शीखांची दोन सर्वात मोठी धार्मिक स्थळे, अमृतसरचे श्री हरमंदर साहिब आणि नांदेड (महाराष्ट्र) चे श्री हजूर साहिब सचखंड यांना जोडते. त्यामुळे यात्रा मार्गावर येणाऱ्या सहा स्थानकांवर वर्षानुवर्षे लंगर प्रसाद दिला जातो. कढी-भात, चणे, मसूर, खिचडी, भाजी, बटाटा-कोबीची भाजी, हिरव्या पालेभाज्या मिळतात.

8/9

दररोज 2000 लोकांसाठी लंगर तयार

Indian Railway Free Food In Train Sachkhand Express route Marathi News

1995 मध्ये सुरू झालेली ही ट्रेन सुरुवातीला आठवड्यातून एकदा धावत होती नंतर त्यात वाढ करुन आठवड्यातून दोनदा करण्यात आली. 1997 मध्ये आठवड्यातून 5 वेळा आणि नंतर दररोज करण्यात आले. हा लंगर एका व्यावसायिकाने सुरू केला होताआता दररोज 2000 लोकांसाठी लंगर तयार केला जातो.

9/9

वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा

Indian Railway Free Food In Train Sachkhand Express route Marathi News

ट्रेनने प्रवास करणारे लोक आगाऊ तयारी करतात. स्टेशनवर पोहोचल्यावर काही सेवक ट्रेनमध्ये आणि काही स्टेशनवर प्रवाशांना लंगर प्रसाद देतात. वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा आजही कायम आहे.