PHOTO : 8 लग्न, सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री तरी मिळालं नाही खरं प्रेम; कोण होती ती?

Entertainment : चित्रपटसृष्टीमध्ये अनेक प्रेम प्रकरण होता, लग्न आणि घटस्फोट होतात. एका अभिनेत्री तिच्या आयुष्यात 8 वेळा लग्न केलं. तरी तिला खरं प्रेम मिळालं नाही. कोण होती ती अभिनेत्री पाहूयात. 

Jan 10, 2025, 23:17 PM IST
1/11

आज आम्ही अशा अभिनेत्रीबद्दल बोलतोय जिने एक प्रसिद्ध अभिनेत्री होती, तिने 13 वर्ष बॉक्स ऑफिस गाजवलं. शिवाय सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. ही अभिनेत्री बॉलिवूड, टॉलिवूडची नाही तर हॉलिवूडची आहे.   

2/11

आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय ती सहा दशक इंडस्ट्री गाजवलंय. तिने बाल कलाकार म्हणून सुरुवात केली आणि अनेक हिट चित्रपट दिले. तिचं नाव आहे. एलिझाबेथ टेलर हॉलिवूडची टॉप अभिनेत्री होती. 1960 मध्ये ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली होती. 

3/11

1957 ते 1970 च्या काळात तर अभिनेत्रीने बॉक्स ऑफिस गाजवला होता. तिने जेवढं हॉलिवूडमध्ये आपलं कामाने नाव कमवलं तेवढं तिच्या वैयक्तिक आयुष्याबदद्ही चर्चेत राहिली.   

4/11

अभिनेत्रीचं आयुष्य चित्रपटाच्या कहाणीला लाज अशी होती. या अभिनेत्रीने तिच्या आयुष्यात 8 वेळा लग्न केलं होतं. मजेशीर म्हणजे एकाच व्यक्तीसोबत अभिनेत्रीने दोन वेळा लग्नगाठ बांधली. 

5/11

अभिनेत्री एलिझाबेथने सगळ्यात पहिलं लग्न कॉनराड निकी हिल्टनशी केलं होतं. तिचं पहिलं लग्न फार काळ टिकलं नाही, काही काळात तिने घटस्फोट घेतला.   

6/11

त्यानंतर अभिनेत्रीने दुसरं लग्न मायकल वाइल्डिंगशी केलं. या लग्नाची फार चर्चा झाली होती. कारण अभिनेत्रीचा दुसरा नवरा तिच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठा असल्याने सगळ्यांचा भुवया उंचावल्या होत्या. पण हे लग्नही फार काळ टिकलं नाही आणि त्यांनी घटस्फोट घेतला.   

7/11

आता अभिनेत्रीचा आयुष्यात तिसरा नवरा आला मायकल टॉड. पण लग्नाच्या काळानंतर मायकेल टॉडचं निधन झालं.   

8/11

आता अभिनेत्रीच्या आयुष्यात एक विवाहित एडी फिशर आला. एडीच्या प्रेमात तिने चौथ्यांदा लग्नाचा निर्णय घेतला. पण काही काळाने नात्यात तणाव आला आणि ते विभक्त झाले.   

9/11

आता तिच्या आयुष्यात प्रेमाची पुन्हा एन्ट्री झाली. हॉलिवूड अभिनेता एलिझाबेथ रिचर्ड बर्टन अभिनेत्री प्रेमात पडली. त्यानंतर अभिनेत्री पाचव्यांदा विवाहबंधनात अकडली. पण हे पाचव लग्नही टिकलं नाही आणि तिने घटस्फोट घेतला.   

10/11

पण दीड वर्षांनी 16 महिने वेगळे राहिल्यावर रिचर्ड आणि एलिझाबेथ पुन्हा जवळ आले आणि त्यांनी सहाव्यांदा लग्न केलं. पण पुन्हा लग्न करुनही त्यांचं नातं टिकलं नाही.   

11/11

आता अभिनेत्रीच्या आयुष्यात जॉन वॉर्नर आला. तिने त्याला आपला सातवा नवरा बनवला. संसार सुरु झाला आणि वादही सुरु झाले. हे लग्न मोडलं. त्यानंतर अभिनेत्रीने आठव्यांदा विवाहबंधनात अडकली. आठव्या नवऱ्याच नावं लॅरी फोर्टेन्स्की होतं.