इंडस्ट्रीमधील सगळ्यात कंजूस अभिनेता, ज्याने सलमान खानला लावला लाखोंचा चुना; तरीही आज सुपरस्टार....

बॉलिवूडमधील एक असा किस्सा... या अभिनेत्याने सलमान खानलाच चुना लावला.

| Sep 30, 2024, 13:55 PM IST

Bollywood Biggest Miser Actor: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे फक्त सिनेमांमधूनच नाही तर साइड बिजनेसच्या माध्यमातूनही चांगली कमाई करतात. काहींकडे तर स्वतःच प्रोडक्शन हाऊस देखील आहे. काही तर लोकप्रिय रेस्टॉरंटच्या ब्रँडचे मालक आहेत. आज बॉलिवूडमधील अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत जो अतिशय कंजुस आहे. पण त्याचा बिझनेस सेन्स आणि पैसे कमावण्याची पद्धत अतिशय भारी आहे. याचा अंदाज तुम्ही त्याने सलमान खानला लावलेल्या गंड्यावरुन ओळखू शकता. 

1/7

कोण आहे हा कंजुस अभिनेता?

बॉलिवूडमध्ये फक्त सिनेमाचीच कथा नाही तर सिनेमामागची गोष्ट देखील रंजक असते. अनेक कलाकारांचे हे किस्से अतिशय इंटरेस्टिंग असतात. इंडस्ट्रीमध्ये मैत्री आणि शत्रूत्व याचे अनेक किस्से चर्चेत आहे. पण हा कंजुस अभिनेता कोण आणि त्याने सलमान खानला का चुना लावला? याचा एक किस्सा आहे. प्रकरण नेमकं काय? 

2/7

दशकांपासून हिंदी सिनेमात कार्यरत

हा अभिनेता आहे चंकी पांडे. ज्याने अनेक सिनेमांमध्ये काम केलंय एवढंच नव्हे तर दमदार कलाकृती देखील दिली आहे. चंकी पांडे यांना अभिनय क्षेत्रात 37 वर्षे झाले आहेत. आता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे या क्षेत्रात आपलं नशीब आजमावत आहे. 

3/7

सुपरस्टार अशी ओळख

1987 साली आलेल्या 'आग से आग' मधून अभिनयाला सुरुवात केली. एवढंच नव्हे तर हा अभिनेता बांग्लादेशमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. त्याला तेथे सुपरस्टार म्हणून ओळखलं जाते. 

4/7

लाखोंचा चूना

बॉलिवूडमधील चंकी पांडे हा एकटा अभिनेता असा आहे जो फ्लॉप असूनही त्याचा स्टारडम कायम आहे. एवढंच नव्हे तर त्याचे फॅन फॉलोइंग फक्त भारतातच नाही तर विदेशातही पसरलेले आहेत. 

5/7

सलमान खानच्या नावे डील

चंकी पांडेने सांगितलं की, सलमान खानचे अनेक फॅन्स आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सलमान खानला फ्रीमध्ये जीन्स आणि शूज दिले पण त्यासाठी 50000 डॉलर आपल्या खिशात टाकले.

6/7

नेमकी डील काय?

अभिनेत्याने सांगितलं की, डील अशी होती की मला सलमान खानला एका दुकानात घेऊन जायचं होतं. मी सलमान खानला सांगितलं चल शॉपिंग करायला जाऊ. मी तुला फ्रीमध्ये शॉपिंग करुन देतो. जेथे त्याने सलमानला फ्रीमध्ये जीन्स आणि शूज दिले. मग सलमान खानला कळलं की, त्या दुकानात सलमानला घेऊन गेल्यामुळे दुकनदाराने चंकी पांडेला 50000 डॉलर दिले.   

7/7

चंकी पांडेच्या कामाबद्दल

चंकी पांडे कायमच आपल्या ह्युमरसोबत कंजुसपणामुळे देखील ओळखला जातो. फराह खानने चंकी पांडेला सर्वात जास्त कंजुस व्यक्ती म्हणून ओळखत करुन दिली. चंकी पांडेने आतापर्यंत 100 हून अधिक सिनेमे केले आहे.