अंगठी मध्ये LCD स्कीन! Casio ने लाँच केली जबरदस्त स्मार्टरिंग

CRW-001-1JR  स्मार्टरिंगचे फिचर्स काय आहेत जाणून घेऊया. 

वनिता कांबळे | Nov 18, 2024, 18:58 PM IST

Casio CRW-001-1JR Smart Ring : सध्या स्मार्टवॉच चांगलेच ट्रेडिंगमध्ये आहेत. स्मार्टवॉचमध्ये फिटनेस आणि हेल्थ ट्रॅकिंगसह अनेक जबरदस्त फिचर्स मिळतात. मात्र, भविष्यात या स्मार्टवॉचची जागा  स्मार्टरिंग घेतील. Casio कंपनीने एक जबरदस्त स्मार्टरिंग लाँच केली आहे. या स्मार्टरिंगचे वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये   LCD स्कीन देण्यात आली आहे. 

1/7

Casio ने लाँच केलेली स्मार्टरिंग Samsung कंपनीच्या स्मार्टरिंगला टक्कर देणार आहे.  

2/7

या रिंगमध्ये फिटनेस तसेच हेल्थ ट्रॅकिंगसारखे कोणतेही फिचर्स देण्यात आलेले नाहीत.   

3/7

कोणाच्याही बोटात ही अंगठी अगदी सहज फिट होवू शकते. कारण यात स्ट्रेचेबल बँड वापरण्यात आला आहे. 

4/7

मेटल इंजेक्शन प्रक्रियेचा वापर करुन एकाच तुकड्यात ही रिंग तयार करण्यात आली आहे. याची क्वालिटी अप्रतिम आहे. 

5/7

 कॅसिओच्या या रिंग वॉचमध्ये लाईट आणि अलार्मची सुविधा देण्यात आली आहे. ही रिंग बॅटरीवर चालते. बॅटर दोन वर्ष टिकेल असा दावा कंपनीने केला आहे.   

6/7

CRW-001-1JR  या स्मार्टरिंगमध्ये Seven-Segment LCD Screen देण्यात आला आहे.   

7/7

क्लासिक वॉचसाठी प्रसिद्ध असलेल्या Casio कंपनीने एक जबरदस्त  Smart Ring लाँच केली आहे. CRW-001-1JR  असे या स्मार्टरिंगचे नाव आहे.