Privacy Feature: युजर्सच्या प्रायव्हसीसाठी व्हॉट्सअ‍ॅप आणणार अनोखे फिचर

 हे फिचर वापरात आल्यानंतर कोणीही तुमच्या प्रोफाइल फोटोचा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही. 

Pravin Dabholkar | Mar 04, 2024, 18:22 PM IST

WhatsApp Privacy Feature: हे फिचर वापरात आल्यानंतर कोणीही तुमच्या प्रोफाइल फोटोचा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही. 

1/8

युजर्सच्या प्रायव्हसीसाठी व्हॉट्सअॅप आणणार अनोखे फिचर

WhatsApp New Feature For Users Privacy Technology News

WhatsApp Privacy Feature: चॅटींग करताना युजर्सची प्रायव्हसी अबाधित राहावी यासाठी मेटा नवनवीन प्रयोग करत असते. वर्षभरात मेटाने व्हॉट्सॲप युजर्ससाठी गोपनियतेशी संबंधित अनेक फिचर्स आणले आहेत.

2/8

प्रायव्हसी फीचरवर काम

 WhatsApp New Feature For Users Privacy Technology News

यात आता आणखी एकाची भर पडली आहे. अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅपने वेब व्हर्जनसाठी चॅट लॉक फीचर आणले आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅप सध्या एका प्रायव्हसी फीचरवर काम करत आहे.

3/8

प्रोफाइल फोटो लॉक

WhatsApp New Feature For Users Privacy Technology News

हे फिचर वापरात आल्यानंतर कोणीही तुमच्या प्रोफाइल फोटोचा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही. 

4/8

थर्ड पार्टी ॲप्ससाठी सपोर्ट

WhatsApp New Feature For Users Privacy Technology News

व्हॉट्सॲप सुरू झाल्यापासून, त्यात थर्ड पार्टी किंवा क्रॉस मेसेजिंगची सुविधा नव्हती. पण आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तुम्ही सिग्नल आणि टेलिग्रामसारख्या इतर मेसेजिंग ॲप्सवरही मेसेज करू शकाल. नवीन फीचरची सध्या चाचणी सुरू असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 

5/8

कोणत्या वर्जनवर पाहाल?

WhatsApp New Feature For Users Privacy Technology News

व्हॉट्सअ‍ॅप एक नवीन अपडेट जारी करत असून 2.24.6.2 या वर्जनवर ते पाहिले जाऊ शकते. या अपडेटनंतर व्हॉट्सॲपवर थर्ड पार्टी मेसेजिंगसाठी सपोर्ट उपलब्ध होईल. WABetaInfo ने आपल्या अहवालात यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

6/8

डीएमएचे निर्देश

WhatsApp New Feature For Users Privacy Technology News

डिजिटल मार्केट ऍक्टने (डीएमए) स्वतःच अशी सुविधा देण्यास सांगितले होते. पण आता व्हॉट्सॲपने हा नियम गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. 

7/8

वेगळी चॅट स्क्रीन

WhatsApp New Feature For Users Privacy Technology News

थर्ड पार्टी ॲप्सद्वारे चॅट करण्यासाठी व्हॉट्सॲपमध्ये एक वेगळी चॅट स्क्रीन उपलब्ध करुन देईल, अशी माहितीही समोर येत आहे. 

8/8

यूजर्स प्रोफाइल लॉक

WhatsApp New Feature For Users Privacy Technology News

असे असले तरी थर्ड पार्टी ॲप्सद्वारे चॅटिंग करणाऱ्या यूजर्सची प्रोफाइल व्हॉट्सॲपमध्ये दिसणार नाही, असेही सांगण्यात येतंय.