अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये 'या' सेलिब्रिटींनी लावली नाही हजेरी!

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये संपूर्ण बॉलिवूडनं हजेरी लावली होती. अमिताभ बच्चन पासून कियारा अडवाणी पर्यंत बॉलिवूडचे जवळपास सगळेच कलाकार तीन दिवसांसाठी जामनगरला पोहोचले होते. मात्र, काही कलाकार या कार्यक्रमात दिसले. पण काही कलाकार होते जे या कार्यक्रमासाठी पोहोचलेच नाही. त्या कलाकारांची नावं जाणून घेऊया.

Diksha Patil | Mar 04, 2024, 18:01 PM IST
1/7

रकुल आणि जॅकी भगनानी

रकुल आणि जॅकी हे 21 फेब्रुवारी रोजी लग्न बंधनात अडकले.  तर प्री-वेडिंग फंक्शन हे 1 ते 3 मार्च पर्यंत सुरु होतं. 1 तारखेला त्या दोघांनी गोल्डन टेंपलचे फोटो शेअर केले होते. 

2/7

काजोल

अजय देवगननं तर प्री-वेडिंग कार्यक्रमात हजेरी लावली होती. मात्र, यावेळी काजोल या कार्यक्रमात दिसली नाही. काजोल ही कोणत्या वर्क कमिटमेंटमध्ये असणार त्यामुळे ती कोणत्या कार्यक्रमात पोहोचली नाही. 

3/7

अनुष्का - विराट

अनुष्का शर्मानं नुकताच अकायला जन्म दिला. ती संपूर्ण कुटुंबासोबत लंडनमध्ये आहे. त्यामुळे ती किंवा विराट यावेळी पोहोचले नाही. 

4/7

हृतिक रोशन

हृतिक रोशन देखील अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात पोहोचला नाही. तर काही दिवसांपूर्वी त्यानं सांगितलं की त्याच्या नसांमध्ये आलेल्या स्ट्रेसमुळे त्याला उभंही राहता येत नाही आहे. त्यामुळे तो यावेळी पोहोचला नाही. 

5/7

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा ही देखील इतर सेलिब्रिटींप्रमाणे अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात पोहोचली नाही. अनेक कार्यक्रमांमध्ये सतत हजेरी लावणारी प्रियांका इथे का नाही पोहोचली. 

6/7

काही दिवसांपूर्वी प्रियांका तिच्या कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद घेत होती. त्यानंतर तिचं शेड्यूल ही खूप व्यस्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे देखील प्रियांका कार्यक्रमात पोहोचली नसेल.

7/7

अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात फक्त बॉलिवूड नाही तर हॉलिवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली होती.