Nayanthara Real Name: नयनताराचं खरं नाव काय? कुणी दिलं 'ही' ओळख

Actress Nayanthara Real Name: गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेली अभिनेत्री नयनतारा. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री नयनताराचं हे नाव खरं नावी. तिचं खरं नाव काय? आणि 'नयनतारा' ही ओळख तिला कुणी दिली?

1/8

नेटफ्लिक्सवर झालं उघड

नयनतारा हे नाव तिचं खरं नाव नसल्याचं नेटफ्लिक्सवरील Nayanthara : 'Beyond the Fairytale' या डॉक्युमेंटरीमध्ये सांगितलं आहे. 

2/8

नयनताराचं खरं नाव

डायना मरियम कुरियन असं नयनताराचं खरं नाव आहे. 

3/8

कुणी दिली ही ओळख

2003 मध्ये नयनताराला दिग्दर्शक सत्यन अनतिक्कड यांनी हे नाव दिलं. त्यांनी तीन नावे दिली होती ज्यामधून 'नयनतारा' हे नाव निवडण्यात आलं. 

4/8

नावचं नाव तर धर्म देखील बदलला

18 नोव्हेंबर 1984 रोजी जन्माला आलेल्या डायनाने नावच नाव तर धर्म देखील बदलला. 7 ऑगस्ट 2011 मध्ये आर्य समाज मंदिर, चेन्नईमध्ये हिंदू धर्म स्वीकारला.   

5/8

लेडी सुपरस्टार

सिनेसृष्टीत आतापर्यंत पुरुषांचीच मक्तेदारी होती. पण नयनताराला 'लेडी सुपरस्टार' म्हणून संबोधलं जातं. 

6/8

दिग्दर्शकाला रात्री 3 वाजता केला फोन

नयनताराला कमी वयात पहिला सिनेमा मिळाला. पण अभिनयात काम करायचं की नाही हा निर्णय तिच्यासाठी महत्त्वाचा होता. तिने रात्री 3 वाजता फोन करुन दिग्दर्शक सत्यन अनतिक्कड यांना आपला होकार कळवला. 

7/8

नयनतारा का चर्चेत राहिली

नयनतारा हे नाव कायमच चर्चेत राहिलं त्यातील एक कारण म्हणजे तिचे अफेअर्स. 2006 मध्ये नयनताराचं नाव सिम्बूसोबत जोडलं गेलं.  नयनताराचे अभिनेता नागार्जुन आणि अभिनेता प्रभुदेवा यांच्यासोबत अफेअर्स होते. त्यानंतर तिने दिग्दर्शक विघ्नेश या आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं. 

8/8

नयनतारा फॅमिली

नयनताराने बॉयफ्रेंड विघ्नेश शिवनसोबत 9 जून 2022 रोजी लग्न केलं. 2015 मध्ये Naanum Rowdy Dhaan सिनेमात एकत्र काम केलं. त्यानंतर एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.