आंघोळीसाठी थंड पाणी योग्य की गरम? ही माहिती वाचून थक्क व्हाल

What is cold water therapy : गरम पाण्यानं आंघोळ करणं योग्य की थंड पाण्यानं या प्रश्नाचं उत्तर विचारलं असता प्रत्येकजण सोयीनंच ते उत्तर देतो. पण, कधी यामागची शास्त्रीय कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का?   

Aug 02, 2023, 12:01 PM IST

What is cold water therapy : मला ना आंघोळीसाठी गरम पाणीच लागतं..., मला तर थंड पाण्यानं आंघोळ केल्याशिवाय जमतच नाही... हे असं म्हणणारी अनेक मंडळी तुम्ही पाहिली असतील. 

1/8

कोल्ड वॉटर थेरेपी

what is cold water therapy benefits for health

तुम्हाला माहितीये 15 अंश किंवा त्याहून कमी तापमान असणाऱ्या पाण्यानं आंघोळ केल्यास या प्रकाराला हायड्रोथेरेपी किंवा कोल्ड वॉटर थेरेपी म्हटलं जातं.   

2/8

अॅथलिट्समध्ये हा प्रकार लोकप्रिय

what is cold water therapy benefits for health

जगभरातील अॅथलिट्स आणि विविध क्रीडा प्रकारांमध्ये योगदान देणाऱ्या मंडळींमध्ये हा प्रकार अतिशय लोकप्रिय आहे. 

3/8

हायड्रोथेरेपी

what is cold water therapy benefits for health

अनेक निरीक्षणं आणि अभ्यासांमधून समोर आलेल्या माहितीनुसार हायड्रोथेरेपीमुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढून आजारपणं तुमच्यापासून दूर राहतात. 

4/8

थंडगार पाण्यानं आंघोळ

what is cold water therapy benefits for health

अनेक तज्ज्ञांच्या मते यामुळं ताणतणाव दूर होण्यासही मोठी मदत होते. परिणामी अनेकजण दिवसभराच्या धकाधकीनंतर थंडगार पाण्यानं आंघोळ करण्याला प्राधान्य देतात.   

5/8

what is cold water therapy benefits for health

साधारण 10 ते 15 मिनिटांच्या कोल्ड वॉटर थेरेपीमुळं अर्थात थंड पाण्यानं आंघोळ केल्यामुळं रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते. अनेकांच्या म्हणण्यानुसार तर, वजन कमी करण्यासाठी ही पद्धत फायद्याची ठरते कारण याद्वारे अनेक कॅलरी बर्न होतात.   

6/8

रक्ताभिसरण

7/8

निरीक्षणातून सिद्ध झालं आहे की...

what is cold water therapy benefits for health

दर दिवशी किमान 10 मिनिटं कोल्ड वॉटर थेरेपी घेतल्यानं मानसिक आरोग्य सुधारण्यातही मोठी मदत होते असं निरीक्षणातून सिद्ध झालं आहे. जर तुमच्या स्नायूंमध्येही तीव्र वेदना होत असतील तर कोल्ड वॉटर थेरेपी यावर मोठी मदत करू शकेल.   

8/8

थंड पाण्याचे फायदे अनेक...

what is cold water therapy benefits for health

किंबहुना तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठीही थंडगार पाणीच फायद्याचं ठरतं. त्यामुळं आता आंघोळ करताना थंड पाण्यानं करायची की गरम पाण्यानं हे तुम्हीच ठरवा. (वरील माहिती निरिक्षणांच्या आधारे घेण्यात आली असून, कोणताही निर्णय घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)