नितीन देसाईच यंदा उभारणार होते 'लालबागचा राजा'चा मंडप; तयारीचे Photos केलेले शेअर

Nitin Desai Death: प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी एन. डी. स्टुडीओमध्ये आत्महत्या केली. नितीन देसाई हे गणरायाचे मोठे भक्त होते. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनच याची प्रचिती येते. नितीन देसाई हे चित्रपटांच्या सेटसाठी ओळखले जायचे. मात्र मुंबईमधील प्रसिद्ध लालबागचा राजाचा सेट आणि मंडपही नितीन देसाईंच्या कल्पनेतूनच साकारला जायचा. यंदाच्या म्हणजेच 2023 च्या सेटचं काम त्यांनी काही आठवड्यांपूर्वीच सुरु केलं होतं. त्याचे फोटो त्यांनीच शेअर केले होते. पाहूयात हे फोटो...

Swapnil Ghangale | Aug 02, 2023, 11:28 AM IST
1/14

Nitin Chandrakant Desai posted lalbaugcha raja 2023 set puja photos

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये नितीन चंद्रकांत देसाईंनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

2/14

Nitin Chandrakant Desai posted lalbaugcha raja 2023 set puja photos

देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गळफास घेऊन नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

3/14

Nitin Chandrakant Desai posted lalbaugcha raja 2023 set puja photos

4 जुलै 2023 रोजी नितीन देसाईंनी लालबागच्या राजाच्या मंडपाचं आणि सेटचं काम सुरु केलं होतं.

4/14

Nitin Chandrakant Desai posted lalbaugcha raja 2023 set puja photos

मंडप पूजन आणि सजावटीला सुरुवात करण्याआधी केलेल्या पूजेचे फोटो नितीन देसाईंनी पोस्ट केले होते.

5/14

Nitin Chandrakant Desai posted lalbaugcha raja 2023 set puja photos

नितीन देसाई यांनी चार आठवड्यांपूर्वीच लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळासाठी 2023 चा सेट उभारण्यासाठी सुरुवात केलेली.

6/14

Nitin Chandrakant Desai posted lalbaugcha raja 2023 set puja photos

लालबागच्या राजाच्या 90 व्या वर्षीच्या मंडप पूजन आणि सजावटीचा श्री गणेशा आज संपन्न झाला, अशी कॅप्शन नितीन देसाईंनी या फोटोला दिला होता. ही पोस्ट त्यांनी 4 जुलै रोजी केली होती.

7/14

Nitin Chandrakant Desai posted lalbaugcha raja 2023 set puja photos

लालबागच्या राजाचा विजय असो, लालबागच्या राजाचा विजय असो, अशा कॅप्शनसहीत नितीन देसाई यांनी हे फोटो शेअर केले होते.

8/14

Nitin Chandrakant Desai posted lalbaugcha raja 2023 set puja photos

2023 च्या थीमनुसार नितीन देसाई यांनी लालबागच्या राजाच्या सेटचं डिझाइनही तयार केलं होतं.

9/14

Nitin Chandrakant Desai posted lalbaugcha raja 2023 set puja photos

मागील अनेक वर्षांपासून नितीन देसाईच लालबागच्या राजाच्या मंडपाचं आणि संपूर्ण सेटचं डिझाइन करायचे.

10/14

Nitin Chandrakant Desai posted lalbaugcha raja 2023 set puja photos

नितीन देसाई दरवर्षी न चुकता लालबागच्या राजाच्या दर्शनसाठी जायचे.

11/14

Nitin Chandrakant Desai posted lalbaugcha raja 2023 set puja photos

नितीन देसाई यांनी मागील वर्षीही लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये दर्शनासाठी गेलेले असतानाचे फोटो पोस्ट केले होते.

12/14

Nitin Chandrakant Desai posted lalbaugcha raja 2023 set puja photos

नितीन हेच लालबागच्या राजाच्या मंडपाचे आणि सेटचे प्रमुख डिझायनर असल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांचा घरोब्याचे संबंध होते.

13/14

Nitin Chandrakant Desai posted lalbaugcha raja 2023 set puja photos

मागील वर्षी लालबागच्या राज्याच्या दर्शन घेतानाचे काही फोटो त्यांनी पोस्ट केले होते.

14/14

Nitin Chandrakant Desai posted lalbaugcha raja 2023 set puja photos

नितीन देसाईंनी लालबागच्या राजाच्या पायावर नतमस्तक झाल्याचा फोटोही पोस्ट केला होता.